श्री दत्तमंदिर गणेश मंडळाचा उपक्रम २५० नागरिकांचा
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना (५ लाख रूपये) नोंदणी
तळोदा :- येथील श्री दत्त गणेश मंडळाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड चे एकदिवसीय शिबीर श्री दत्त मंदिर तळोदा येथे आज शनिवार दिनांक १४|१०|२०२३ रोजी सकाळी ९ वाजता सुरू केल्यावर तळोदे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व आयुष्यमान भारत कार्डचे के वाय सी करुन घेतले.
वेळेअभावी नोंदणी केलेल्या ४५० नागरिक उपस्थित राहिल्या पैकी २५० नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड चे काम करण्यात आले. व राहिलेल्या नागरिकांची नोंदणी केलेले नागरिकांचे लवकरच करण्यात येईल. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने श्री दत्त गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला. यावेळी उपस्थित के टेक्नॉलॉजी च्या संयुक्त विद्यमानाने संचालक तथा मंडळाचे कार्यकर्ते केतन तांबोळी, पंकज तांबोळी, कांतीलाल पाटील, भुषण होळकर, रविंद्र मराठे, गोलु बारी, नितीन गरुड, निहाल वसावे, हर्षित बारी, रोहित माळी, सुरज पाटील, विजय सोनार, आशिष बारी, मुकेश होळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.