सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि १३
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा दृष्टीने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी विराट सभेचे आयोजन केले आहे.सभेला लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
सराटी येथे दि.14 रोजी होणारी महाविराट सभा ही ऐतिहासिक किंवा इतिहासात नोंद होईल अशीच परिस्थिती आहे. कदाचित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुध्दा या सभेची नोंद होवू शकते असेही काही बांधवांचे मत आहे.
प्राप्त माहितीनुसार आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्या सभेसाठी जवळपास 150 एकर जागा ठेवण्यात आली असून विविध ठिकाणी पार्किंगसाठी सुध्दा जवळपास 150 एकर जागा ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कारण राज्यभरातून समाजबांधव या विराट सभेला प्रचंड मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यात माता भगीनींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे समाज बांधवांची सेवा म्हणून ठिकठिकाणी चहा, पाणी, नाष्टा इत्यादीची सुध्दा सोय करण्यात येत आहे.
आतापर्यंत जर जवळपास 150 एकर सभेसाठी आणि 150 एकर पेक्षा जास्त पार्किंगसाठी जागा ठेवण्यात आल्याचे दिसत असल्यामुळे आंतरवाली सराटी येथे येणाऱ्यांची संख्या अर्थातच काही लाखात असणार आहे.
एकूण परिस्थिती पाहता किती लाखात पब्लिक राहील याचा अंदाज कोणालाही बांधणे सध्यातरी अवघड आहे. मात्र तरीही काही बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ते 20 लाखाच्या पुढे हा आकडा जावू शकतो असा अंदाज काही बांधवांनी व्यक्त केला आहे.
सद्ध्या उन्हाची तीव्रता पाहता काळजी घेण्याचे व आपणास लागणारी औषधे जवळ बाळगण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.