जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी च्या वतीने कल्याण येथील के.सी.गांधी स्कुलच्या सभागृहमध्ये संपन्न झालेल्या जायंटस के सितारे या सांस्कृतिक कार्यक्रमात जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे कौन्सिल सदस्य व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांना कृतज्ञता सन्मानचिन्ह जायंटस कल्याण मिड टाऊनचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध विकासक संजय गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.याप्रसंगी कल्याण जिल्हा कारागृह अधीक्षक राजाराम भोसले,जायंटस वेल्फेअर फौंडेशन चे सेंट्रल कमिटी मेम्बर के.नंदकुमार,स्पेशल कमिटी मेम्बर गगनभाई जैन व मनोहर पालन,फौंडेशन वन सीचे अध्यक्ष आशिष खंडेलवाल आणि कार्यक्रमाचे चेअरमन डॉ.किशोर देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.