कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. एम एम वळवी हया होत्या. जनजाती गौरव पुस्तक प्रकाशन जनजाती केंद्रीय समिती सदस्य डॉ विशाल वळवी, जनजाती समिती प्रांताध्यक्ष वीरेंद्र वळवी, सेवानिवृत्त बी एस एन एल चे अधिकारी अर्जुन वळवी, दीपक आर्य, ग्रामपंचायत सदस्य वरूण गावीत, तारकेश्वरी नाईक, पर्यवेक्षक पी एस भावसार, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एस आर महाजन, वाय आर गुरव, सौ एस बी गावीत, आर वाय निकुंभ, राजेंद्र वाघ यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी डॉ विशाल वळवी यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात विशाल ज्वेलर्स खांडबारा यांच्या वतीने 18 पुस्तकांचा संच शाळेला भेट म्हणून मुख्याध्यापिका सौ एम एम वळवी यांच्याकडे दीपक आर्य यांनी सुपूर्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वा आर गुरव यांनी मानले.कार्यक्रमासाठी डी पी वळवी, एन जे गावीत शिक्षकेतर कर्मचारी विनोद गावीत, उमेश चित्ते यांनी परिश्रम घेतले.