Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : शिक्षक पदभरती प्रकरण : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पवित्र पोर्टल मार्फत परवानगी आदेश

 मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : शिक्षक पदभरती प्रकरण : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पवित्र पोर्टल मार्फत परवानगी  आदेश 
नंदूरबार - याचिकाकर्ती भारती हरिशचंद्र वसावे, रा. अक्कलकुवा तालुका, हिने  सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई, आयुक्त, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे, उप आयुक्त व  शिक्षण संचालक, यांच्या विरुद्ध सहाय्यक शिक्षक पदासाठी पवित्र पोर्टल मार्फत स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत व भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्विकारण्यासाठी  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती. थोडक्यात माहिती अशी कि, याचिकाकर्ती हिची शैक्षणिक पात्रता बी. ए. , डि. एड.  असून सीटीइटी व टेट ही परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केलेली आहे. याचिकाकर्ती हिने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदूरबार, यांना देखील गुनानुक्रमे पेसा क्षेत्रात शिक्षक भरती प्रक्रियेत नाव समाविष्ट करण्यासाठी निवेदन दिले होते. याचिकाकर्ती ही सहाय्यक शिक्षक पदासाठी पवित्र पोर्टल मार्फत अर्ज करण्यासाठी पात्र असूनही अर्ज स्विकारण्यात आले नव्हते. प्रतिवादी यांनी सुद्धा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी उमेदवारांसाठी वेळोवेळी सूचना प्रकाशित केली होती. याचिकाकर्ती हिने सुद्धा  न्यायालयाने पारित केलेल्या निर्णयांचे संदर्भ दिलेले होते.  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती श्री. रविंद्र वि. घुगे व  न्यायमूर्ती श्री. वाय. जी. खोब्रागडे) यांनी आदेशान्वये याचिकाकर्ती हिला ईमेलद्वारे ठराविक माहिती तत्काळ पाठविण्याचे तसेच प्रतिवादी यांना याचिकाकर्ती हिचे प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत सहभागी होण्याचे आदेश दिलेले आहेत.