Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पोषण पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याने जि.प.सदस्य सी. के.पाडवी यांना निवेदन

पोषण पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याने जि.प.सदस्य सी. के.पाडवी यांना निवेदन
मोलगी दि १३ (प्रतिनिधी)
    अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील यूनिसेफद्वारे चालवण्यात येणाऱ्या पोषण पुनर्वसन केंद्रात सात वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात समाविष्ट करुन घ्यावे यासाठी जि.प.सदस्य सी. के. पाडवी यांना निवेदन देण्यात आले.
           मोलगीच्या अतिदुर्गम परिसर असलेल्या सर्वच बालकांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न म्हणून पोषण पुनर्वसन केंद्राची सहा वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. केंद्रातील सर्व कर्मचारी सुरुवातीपासून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षकाच्या देखरेखीखाली काम करत होते. आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद काम केले. या केंद्रास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व माजी मंत्री के.सी.पाडवी व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी भेटी देऊन पाहणी केली व त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. जिल्हा प्रशासकीय स्तरावरून या केंद्राच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व अनेक लोकप्रतिनीधीनी वारंवार भेटी देऊन कामाचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
               दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, इतके कौतुकस्पद काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज राष्ट्रीय आरोग्य अभियानात समायोजन न करता यूनिसेफचा प्रकल्प पूर्ण झाला या सबबीखाली सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. प्रशासनाने सर्व संपूर्ण सातपूड्यातील कुपोषित बालकांचा तसेच कर्मचाऱ्यांचा सकारात्मक विचार करुन कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात समायोजन करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर वर्षा पावरा, शीतल वळवी, कांचन वळवी, अनिता वसावे, पार्वती वळवी व सुनंदा वळवी यांच्या सह्या आहेत.