तळोदा दि १३(प्रतिनिधी) तळोदा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांच्या बद्दल प्रा नामदेव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण विषयी भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह प्रा नामदेव जाधव विरोधात तक्रार केली आहे.
तक्रारीत नमूद की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल सोशल मीडिया वर खोटी व अपमानजनक दिशाभूल करणारी व दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणारी खोटी बातमी शेअर केल्या बद्दल त्यांच्या वर गुन्हा दाखल होऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. तळोदा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना उदेसिंग पाडवी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार यांच्या लेटर हेडवर निवेदनच्या माध्यमातून तक्रार नोंदवली यावेळी जिल्हाउपाध्यक्ष याकूब सर,तालुका अध्यक्ष संदीप परदेशी,शहराध्यक्ष योगेश मराठे,उपसभापती कृ. उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय,मा.नगरसेवक गणेश पाडवी, शहराउपाध्यक्ष अनिल पवार,अलसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ शेख,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,युवक शहराध्यक्ष गणेश राणे,खजिनदार धर्मराज पवार,संदीप वळवी,मधू सुर्यवंशी,कुसेंद्र चव्हाण,मोहित चव्हाण,लक्ष्मीकांत माळी,मनीष बत्तीसे,युवराज चव्हाण,विजय चव्हाण,आनंद ठाकरे,अजय ठाकरे,रईस बेलदार,नईम बागवान,सोहेब पठाण,साहरुख कुरेशी,सागर खैरनार उपस्थित होते .