Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टीच्या "बेटी वाचवा बेटी शिकवा " अभियान अंतर्गत शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात तळोदा येथे"घर तिथे रांगोळी स्पर्धेचे"आयोजन

तळोदा दि १४(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या "बेटी वाचवा बेटी शिकवा " अभियान अंतर्गत 
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात तळोदा येथे
"घर तिथे रांगोळी स्पर्धा" स्पर्धेचे दि २० नोव्हेंबर रोजी आयोजन केल्याची माहिती भाजपाच्या बेटी बचाओ बेटी पढाओचे जिल्हा समन्वयक निलाबेन मेहता यांनी दिली.
           रांगोळी उत्साहाचे प्रतीक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. देवी- देवतांच्या स्वागतासाठी, घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी मुख्य दरवाजात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. रांगोळी काढल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होवून तो तणावमुक्त राहतो. रांगोळीमध्ये विविध प्रकारची फुले किंवा रंग वापरल्याने आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा अधिक संचार होतो. त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम होतो.रांगोळीच्या माध्यमातून घराघरांत सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी भाजपा तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
          या स्पर्धेत प्रथम बक्षिस (राज्य स्तरीय ) रु.21000/- व स्थानिक स्तरावर बक्षीसांचे नियोजन करण्यात आले आहे.
           स्पर्धेसाठी नाव नोंदणीसाठी मो.८६६८६४५२५२/९६६५७१४४३० / ७३८५९२१२९२ येथे संपर्क करावा 
स्पर्धा दि. २० नोव्हेंबर २०२३ होणार असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम तारीख: १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत आहे.
                स्पर्धेसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. शुभा फरांदे - पाध्ये, प्रदेश समन्वयक म‌णालिनी बागल,आमदार राजेशपाडवी,यांचे मार्गदर्शन लाभले असून माजी नगराध्यक्ष अजय परदेशी,भाजपा तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी,नगरसेवक जितेंद्र माळी, सुभाष चौधरी यांचे सहकार्य लाभत आहे.