शहादा दि ३०(प्रतिनिधी) अवकाळी पावसामुळे अंगावर वीज कोसळून तालुक्यातील जावदा त.बो. येथील सपना राजु ठाकरे ही तरुणी मयत झाली होती या मयत मुलीच्या कुटुंबीयांना शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भेट घेऊन सात्वन करीत शासकीय मदतीचे चार लाख रुपयांच्या धनादेश सुपूर्द केला.
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात 26 नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसावेळी आकाशात कडाडणारी विज अंगावर येऊन पडल्याने शहादा तालुक्यातील जाऊदा त.बो. येथील सपना राजू ठाकरे हिच्या मृत्यू झाला होता.
या मयत मुलगी च्या कुटुंबीयांची भेट आमदार राजेश पाडवी यांनी घेतली या कुटुंबीयाचे सात्वन करीत त्यांना शासकीय मदतीच्या आलेला चार लाखाच्या धनादेश देण्यात आला आहे याप्रसंगी तहसीलदार दिपक गिरासे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील जिल्हा परिषद सदस्य योगेश पवार, तालुका अध्यक्ष शांतीलाल पाटील,राजाभाई पाटील, आंनदसिग गिरासे,उपाध्यक्ष किशोर मराठे, पोलीस पाटील विक्रम पाडवी, दिपक गिरासे, गोपाल गागुर्डे, प्रदीप ठाकरे ,अनिल ठाकरे,कलमाडी सरपंच उत-या ठाकरे,माजी शहराध्यक्ष विनोद जैन, प्रशांत कुलकर्णी विठ्ठल बागले, सामाजिक कार्यकर्ते दिपक ठाकरे व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.