सहयोग सोशल ग्रुपचे सामाजिक उपक्रमात गरीब गरजूंना दिवाळी फराळ वाटपाचे सहावे वर्ष
तळोदा दि ९ (प्रतिनिधी) येथील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे शहरातील गोरगरिबांना त्यांच्या वस्तीवर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
दिवाळीच्या सण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असला तरी गोरगरीब कुटुंब या सणाच्या आनंदाला परिस्थिती अभावी पारखे होतात ,हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे व वाढत्या महागाईमुळे संसाराच्या गाडा ओढून नेणे हे त्यांच्या आवाक्या बाहेरचे असते त्यांची कसली दिवाळी ? दिवाळीच्या आनंदाला हे गरीब लोक पारके होतात अशा गरीब कुटुंबातील लहान मुले मुली दिवाळी उत्साह साजरी करणाऱ्या सधन कुटुंबाकडे त्यांनी केलेले आतिषबाजीकडे पाहत त्यांच्या घरासमोर रेंगाळताना दिसतात,समाजात हे वास्तव आपण नेहमीच पाहत असतो.दिवाळीच्या आनंदाला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पारखे झालेल्या अशा गोरगरीब कुटुंबाच्या वस्तीवर जाऊन अशी गरीब कुटुंबे व त्यांच्या मुला बाळांना दिवाळीच्या फराळाचे पॅकेट वाटप करून त्यांची दिवाळी गोड व आनंदी करण्याच्या एक आदर्श उपक्रम शहरातील सेवाभावी सामाजिक संघटना सहयोग सोशल ग्रुप राबवीत आहे गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे.
यावर्षी दरवर्षीप्रमाणे संहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष व त्यांच्या सहकार्य तर्फे हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार पोलीस उपनिरीक्षक महेश निकम ,पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार ,ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश मगरे ,रमेश कुमार भाट ,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक पाडवी इतर पोलीस पाटील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्राध्यापक रमेश मगरे पोलीस निरीक्षक पवार ,निकम ,गाडी लोहार यांनी सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून या सेवाभावी उपक्रम राबवणाऱ्यांना ऍड अल्पेश जैन यांचे कौतुक केले या कार्यक्रमास कुशल जैन ,चेतन शर्मा, मोईन पिंजारी ,प्रमोद जहांगीर ,नितीन पाटील ,प्रेम पाडवी ,काळूसिंग पाडवी दीपक पाडवी ,किसन भरवाड ,चेतन धनका, अक्षय धानका ,हरेश भरवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया-;
१)दिवाळीच्या आनंदायी पर्वावर गोरगरीब कुटुंबात दिवाळीच्या फराळ वाटप करण्याचे सामाजिक कार्य गेल्या सहा वर्षापासून सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे समाजाला या उपक्रमातून प्रेरणा मिळेल
राहुल पवार
पोलीस निरीक्षक तळोदा
२) गोरगरिबांना दिवाळीच्या फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करणाचा वैशिष्टेपूर्ण उपक्रम संहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष व त्यांच्या सहकारी गेल्या सहा वर्षापासून राबवित आहेत त्यांचे कार्य कोतुकास्पद आहे.
प्राध्यापक रमेश मगरे
जिल्हाध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा नंदुरबार