तळोदा दि ९ (प्रतिनिधी) आजचा युगात प्रत्येक व्यक्ती स्वत: च्या प्रगतीच्या आणि पैशाच्या भौतिक सुखाच्यामागे एवढा धावतो आहे.आहे त्यात समाधानी न राहता तो त्याचा आनंद ही हरवून बसला आहे. ज्यामुळे मानसिक तणावामुळे मानसिक आरोग्यही हरवून बसला आहे.
हल्ली डिजिटलायझेशन च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अगदी बालपणापासूनच मुले मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सच्या अधीन जाऊन त्यांचे व्यसन बनले आहे, ते न मिळताच टोकाची भूमिका घेऊन लहान वयातच त्यांच्या मनात आणि कृतीत बंड दिसून येते. पूर्वी यागोष्टी नसल्याने शाळेत किंवा पालक मुलांना शारीरिक, मैदानी खेळ शिकवीत ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमताही वाढत असे. याच बरोबर मुले खेळता-खेळता अनेक गोष्टी जशा नाणी, नोटा, पोस्टाचे स्टॅम्प, काडेपेटीच्या छाप, मान्यवरांच्या स्वाक्षरी असे छंद जोपासत होते. त्यातूनच ते खरा बालपणाचा आनंद लुटत असत. त्यात संस्कारातून पुढे मोठेपणीही तो छंद आवड स्वतःही आणि आपल्या भावी पिढीतही रुजवतअसे, तीच खरी काळाची गरज आहे, आज मुलांना व्हिडिओ गेम्स मोबाईल यागोष्टीं पासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना त्यांच्या आवडीच्या कलेकडे, जसे गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला याचबरोबर विविधगोष्टींचा संग्रह करणे याकडे त्यांचे मन वळवले पाहिजे.याचा विचार करून शैलेंद्र पवार. (कलाशिक्षक)
कु.यो.ई.म.माध्यमिक विद्यालय सरदारनगर.ता.तळोदा जि.नंदूरबार.हे फलक रेखाटन / लेखनाचा माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांत कलेची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, भारतीय सण उत्सवांचे चित्रांचे रेखाटन करुन व्यवसाय सांभाळत विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून संस्कृतीची ओळख आणि संस्कार करण्याचे कार्य आदिवासी, ग्रामीण भागात करीत आहेत.त्यांचा कलेचे अनेक जण चाहते आहेत.