Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्पर्धेचा आणि संगणकाच्या युगात प्रत्येकाला ज्ञान अद्यावत राखणे महत्वाचे आहे - विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी

 अक्कलकुवा दि ७ (प्रतिनिधी) भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज पासुनच आपल्या भविष्याचे ध्येय निश्चित करुन त्या पद्धतीने मार्गक्रमण केले तरच यशाची प्राप्ती होईल आताचे युग हे स्पर्धेचे आणि संगणकाचे असल्याने त्याबाबत ही प्रत्येकाला अद्यावत राखणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
       तालुक्यातील होराफळी येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा संवाद मेळावा घेततला यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आ.पाडवी अध्यक्षस्थाना वरुन बोलत होते. यावेळी संवाद मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले,नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, तालुकाप्रमुख मगन वसावे,सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र वसावे, तालुका संघटक आनंद वसावे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, माजी सरपंच विनोद वळवी, युवा सेनेचे युवा नेते कुणाल जैन, शिवसेना तालुका उपप्रमुख बिज्या वळवी, गोलू चंदेल, दहेलचे सरपंच कर्मा वसावे, होराफळीचे सरपंच अर्जून वळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर वळवी, धर्मा पाडवी, माजी सरपंच सुरता वळवी,संजय ठाकरे, मुख्याध्यापक व्ही.एस.इंगळे, व्ही.एम.पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी विद्यार्थ्यां सोबत संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक अडी अडचणी समजुन घेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या वेळी लक्ष्मण वाडीले, मगन वसावे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रम शाळेचे शिक्षक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.