Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आदेश

 मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश 
 जळगाव दि ६ (प्रतिनिधी) फिर्यादी याने सलमान पटेल व इतर, राहणार भुसावल, यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे - भुसावल बाजार पेठ, येथे गुन्हा भा.द.वि. कलम ३२६, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी कि, फिर्यादीची मामी, मोठी आई व इतर उसनवारीच्या पैशांवरून भांडण करीत होते. आरोपींनी सदर ठिकाणी येऊन फिर्यादी यांना भांडणात पडू नको असे सांगून मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. आरोपींनी नातेवाईकांनाही मारहाण केली होती. नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये नेले होते परंतू चक्कर येत असल्यामुळे दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आले होते. परंतु परत त्रास होत असल्याने उपचार कामी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आरोपींनी सदर गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी माननीय सत्र न्यायालय भुसावल, येथे जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू, माननीय न्यायालयाने सदर जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध आरोपींनी माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, येथे अटकपूर्व जामीन अर्ज एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत दाखल केले होते. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (माननीय न्यायमूर्ती श्री. आर. एम. जोशी) यांनी दिनांक १२.०९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये सदर अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज अटी व शर्तीसह मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. दिनांक ०३.११.२०२३ रोजीच्या आदेशान्वये सदर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. आरोपी तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (९५१८३२३७२६) यांनी काम पाहिले.