Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाला आज प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सतिष चौधरी यांनी भेट

वाण्याविहीर दि ५ (प्रतिनिधी)
     श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय वाण्आयाविहीर ता अक्कलकुवा येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सतिष चौधरी यांनी भेट देऊन शिक्षकांशी शैक्षणिक विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले.
     अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात आज नंदुरबार जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. सतीश चौधरी यांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांशी विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले व शालेय कामकाजाची पाहणी केली असता डॉ. चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव प्रभाकर उगले, मुख्याध्यापक एच. के .पाडवी, उपमुख्याध्यापक जे. एस. झाल्टे, पर्यवेक्षक एन.आर.कोते,शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश्वर बुवा,संजय राणे,बी. टी.मगरे,पी. आर. वसावा वरिष्ठ लिपिक सतिष पाठक यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने  सत्कार करण्यात आला.
      शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शिक्षकांनी वेळेवर व गुणवत्तापूर्ण अध्यापनाचे काम करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे गुणवत्ता वाढ होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांची वर्गात असलेली उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी पालकांशी शिक्षकांनी नेहमी संपर्कात राहून जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेत कसे येतील. व गळती स्थगिती चे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच शासनाकडून येणारे उपक्रम पूर्णपणे राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे. यावेळी नवीन शैक्षणिक धोरणातील बदल यावर ही चर्चा करण्यात आली. एकंदरीत शालेय परिसर, विद्यार्थी उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केले.