Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संसदरत्न खा. डॉ. हिनाताई गावित यांनी फटाके वाटप कार्यक्रमात चिमुकल्यांसमवेत घेतला सेल्फीचा आनंद!

संसदरत्न खा. डॉ. हिनाताई गावित यांनी फटाके वाटप कार्यक्रमात चिमुकल्यांसमवेत घेतला सेल्फीचा आनंद!

नंदुरबार दि१२(प्रतिनिधी) विविध कार्यक्रमानिमित्त संसद रत्न खासदार डॉक्टर हिना ताई गावित यांचे दौरे होतात त्यावेळी अनेक ठिकाणी सेल्फी काढणाऱ्या महिलांची आणि युवक युवतींची झुंबड उडते. परंतु नंदुरबार येथील फटाके वाटप कार्यक्रमात उपस्थित लहानग्या विद्यार्थी मुलामुलीं समवेत सेल्फी घेत संवाद करीत खा. डॉ. हिनाताई गावित आनंदोत्सव साजरा करताना दिसल्या. 
           बेवारस जखमी गाय बैल यांना उपचार मिळवून देणे, भटक्या गाईंना चारा उपलब्ध करून देणे, कन्या पूजन करून दरवर्षी मुलींच्या सन्मानाचा संदेश देणे यासारखे उपक्रम राबविणारे हिंदू सेवक केतन रघुवंशी यांनी सालाबादप्रमाणे यंदाही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दिपावलीनिमित्त संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते कमी प्रदूषण होणारे फटाके वाटप करण्याचा हा उपक्रम घेतला. नंदुरबार शहरातील डी.आर.हायस्कूलमध्ये चिमूकल्यांना फटाके वाटप कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी खा.डॉ.हिना गावित होत्या. यावेळी हिंदुसेवक केतन रघुवंशी माजी नगरसेवक वसईकर, आनंद माळी, लक्ष्मण माळी, निलेश पाडवी, पत्रकार योगेंद्र दोरकर, सुनील वाघरी आदी उपस्थित होते. 
              त्याप्रसंगी फटाके मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुललेला दिसून आला. खासदारांनी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी घेवून दीपावली उत्सव साजरा केला. खा.डॉ.हिना गावित यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत दिपोत्सव आनंदात साजरा करताना कमी प्रदूषण होणारे फटाके फोडावे, विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत जावे तसेच खूप अभ्यास करून मोठे अधिकारी व्हावे, असे आवाहन केले. यादरम्यान खा.डॉ.हिना गावित चिमूकल्यांचा सेल्फी घेवून दिपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे आई-वडील व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केतन रघुवंशी यांनी केले.