Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपाच्या तीन राज्यातील विजयामुळे महाकाली ग्रुप व महाकाली बहुउद्देशीय संस्थे मार्फत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा

तळोदा दि ३(प्रतिनिधी) देशातील चार राज्यांचा विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागला असून मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथे भारतीय जनता पक्षाने दणदणीत बहुमत मिळवल्याने मारुती मंदिर चौक येथे महाकाली ग्रुप व महाकाली बहुउद्देशीय संस्थे मार्फत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाशदादा वळवी, शिरीषनाना माळी (बब्बू नाना), अनिलभैय्या परदेशी, भरतभाई गांधी, संजयभाऊ सोनार, राजेंद्रभाऊ सोनार, राजू ठक्कर, संजयशेठ वाणी, नरेंद्र शेंडे, तुषार मगरे, निलेश माळी, कल्पेश सूर्यवंशी, स्वप्नील सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, इंजि नितेश माळी, धनंजय मगरे, पवन सूर्यवंशी, दिशांक माळी, विवेक सूर्यवंशी, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.