Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिरपूर शहर पोलीसांची कारवाई यांत विदेशी दारू ४९.२१.१८०/- रूपये व आयशर वाहन ३०,००,०००/- रूपये किंमतीचे असा एकुण ७९.२१.१८०/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त , वाहन चालक फरार

शिरपूर शहर पोलीसांची कारवाई यांत विदेशी दारू ४९.२१.१८०/- रूपये व आयशर वाहन ३०,००,०००/- रूपये किंमतीचे असा एकुण ७९.२१.१८०/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरपूर दि ५(प्रतिनिधी) शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर यांना दि.०४/१२/२०२३ रोजी रात्री २२.०० वाजेचे सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळालो की, सेंधवा राज्य मध्य प्रदेशकडून बोराडी-वाडीमार्ग आयशर वाहन क्र. आर नं.१९ जी.एच.८४८२ येत असून त्यामध्ये अवेध दारूची चोरटी वाहतुक होत आहे.
       त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. ए. एस. आगरकर यांनी पोनि/हेमंत खैरणार यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पोडनि/हेमंत खेरणार यांनी डी.वी. पथकासह वाडी ता. शिरपुर जि. धुळे येथे जावून पंचांसह सापळा लावला असता २३.५७ यातचे सुमारास एक आयशर वाहन क्र. आर.जे.१९.जी. एच.८४८२ असं बोराडी गावाकडून वाडी गावाकडे येतांना दिसले सदरचे वाहन वातमोतोल नमूद असल्याने मदर वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याम सांगितले असता त्याने मदरने वाहन न थांबविता त्याने त्याचे वाहन परत बोराडी गावाकडे वळवून तो जोराने जावू लागल्याने त्याचा संशय आल्याने सदर वाहनाचा पाठलाग करीत असतांना वाहनावरील चालकाने त्याचे वाहन बोराडी गावाचे अलिकडे रस्त्यावर अंधारात उभे करून अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला, त्याचा बोराडी गावात तसेच आजु बाजु परिसरात शोध घेतला असता मिळून आला नाही.
        सदर आयशर वाहन क्र. आर. जे. १९/जो.एच.८४८२ जवळ पंचांसह जावून पाहिले असता तेथे लोक जमलेले व वाहनाची ताडपत्री उघडी दिसली, सदर वाहनातून आंबट उग्र वास येत असल्याने सदर वाहनाची पंचांसमक्ष पाहणी केली अगसता सदर वाहनात प्लास्टीक गोण्यांमध्ये प्रत्येकी २ पुट्ट्यांचे खोके त्या खोक्यांमध्ये विदेशी दारुचा माल हा फक्त पंजाव राज्यात विक्रीसाठी परवानगीचा असल्याचे माहित असतांना तो पंजाब राज्य सोडुन इतर राज्यात विक्री करण्याचे हेतूने सदर मालाचे मालक, मालाचा खरेदीदार, मालाचे पुरवठादार व वाहनाचे मालक यांचे मदतीने कट रचून सदर मानायगेल किमत बारकोड व युचचरोल यंण्ड रोल खोडून पुरावा नष्ट करून सदर विदेशी दारूचे मालाची बाजारात विनापरवाना चोरटी विक्री करण्यासाठी त्याचे वाहनात भरुन कब्जात बाळगून त्याची बेकायदेशीररित्या चोरटी वाहतुक करतांना ४९,२१,१८०/- रूपये किंमतीची रॉयल स्टंग वरेल मिलेक्ट, रॉयल चॅलेंज व मंकडविल्स नं.१ कंपनीची व्हिस्की असा विविध कंपनीचा विदेशी दारूचा मालासह ३०,००,०००/- रूपये किंमतीचे आयशर वाहन क्र. आर.नं.१९/नी.एच.८४८२ असा एका ७९.२१.१८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत पोना प्रमोद ईशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहन क्र. आर.जे.१९/जी.एच.८४८२ वरील चालक नाव गाव माहित नाही तसेच सदर वाहनात मिळून आलेल्या मालाचे मालक, खरेदीदार, पुरवठादार व वाहनाचे मालक नाय गाव माहित नाही अशांविरूध्द शिरपुर शहर पा.स्टे.ना म.प्रो.का.क्र.६५ (अ), ६५ (ई), ८०११) (२), ८३ सह भादंवि कलम २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून उल्ल्नेखनीय कामगिरी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास मा. पोनि आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि गणेश कुटे हे करीत आहेत,
        सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळ नगच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पां. स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. ए. एम. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, संदिप दरवडे, हेमंत खैरणार व गणेश कुटे तसेच डी.ओ. पथकाचे पोहकां ललीत पाटील, पहिकां प्रेमसिंग गिरासे, पोना रविंद्र आखडमल, पोना प्रमोद ईशी, पोकों योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, प्रशांत पवार, दिपक खैरनार, विवेकानंदन जाधव, भूपेश गांगुर्डे, मोहन सुर्यवंशी, सुशिलकुमार गांगुर्ड, शांतीलाल पावर व चापोका/ रविंद्र महाले तसेच होमगार्ड मिथुन पचार, शरद पारधी व चेतन भावसार अशांनी मिळून केली आहे.