Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रकाशा तीर्थक्षेत्राला आदिवासी विकास विभागा ने पर्यटन विभागाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी, नवा 'लुक'; रस्ते व सुशोभीकरण - मंत्री डॉ. विजयकुमार गावित

प्रकाशा तीर्थक्षेत्राला आदिवासी विकास विभागा ने पर्यटन विभागाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी, नवा 'लुक'; रस्ते व सुशोभीकरण - मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार - जिल्ह्यातील तापी काठच्या प्रतीकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिर परीसरातील घाटांना आणि रस्त्यांना सुशोभीकरणाचा नवा 'लूक' दिला जाणार असून प्रकाशा शहरातील रस्त्यांचा देखील नव्याने विकास केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपलब्ध करून दिला आहे. 
        जिल्ह्यातील तापी काठावरील प्रतीकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिर परीसराचे सुशोभीकरण केले जाणार असून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने त्याचा आराखडा निश्चित केला आहे. त्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच त्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्ष प्रकाशा येथे केदारेश्वर मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली. तेथील घाटांचे, रस्त्यांचे आणि स्मशानभूमीचे आराखडे अधिकाऱ्यांकडून समजून घेतले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्रभाई पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहादा येथील कार्यकारी अभियंता मयूर वसावे, इंजि. आकाश पाटील, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण पाच कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्या पाच कोटींमध्ये या परिसरातील रस्ते त्याचबरोबर या नदीकिनारी व घाटाच्या बाजूला सर्व बसण्याची व्यवस्था केली जाईल. मंदिर परिसरातील विक्रेत्यांची व्यवस्था होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशस्त कॉम्प्लेक्स उभारणे, परिसराला सुशोभित करू शकणाऱ्या विद्युत दिव्यांची उभारणी करणे यासारख्या कामांचाही त्यात समावेश राहील. घाटावर विविध प्रकारच्या विधीसाठी येणाऱ्या भाविकांना वस्त्रपालटण्यासाठी खुल्या करून दिल्या जातील. पूर्वीची स्मशानभूमी देखील विकसित केली जाणार असून तिथपर्यंत जाण्यासाठी चे पक्के रस्ते केले जातील. जे काही भक्त येतील त्यांना स्मशानभूमी कडे जाणाऱ्या लोकांचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्यासाठी वेगळा रस्ता करून दिला जाणार आहे. आपण पर्यटन विभागाला दिलेल्या पाच कोटी मधून प्रकाशा शहरातील रस्ते विस्तारित करणे काँक्रिटीकरण करणे याबरोबरच शहादा व नंदुरबार कडे जाणाऱ्या प्रकाशा येथील रस्त्यांचे नवनिर्माण करणे अशा कामांचाही समावेश करण्यात आला आहे; अशी माहिती याप्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.