अक्कलकुवा (दि.६) वार्ताहर
अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुर्नवसन येथे मशरूम पिकापासून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथे आपल्या राहत्या घरात मशरूमची शेती एका लहानशा घरात चालू होतं पण आता या गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी मशरूम शेतीला सुरुवात केली असून त्यातून आर्थिक लाभ होत आहे त्याच्यातल्या पहिला युनिट पूर्वीपासून आहे तर नवीन तीन युनिट चालू झाले आहेत या नवीन युनिट मधून सुशिक्षित बेरोजगार असल्यानं रायसिंग वसावे व त्यांच्या पत्नीने मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्याकडून मशरूम शेती व व्यवसायिक प्रशिक्षण घेऊन यशस्वी करून दाखवले आहे.
आपल्या राहत्या घरात दहा बाय दहा एवढ्या खोलीत मशरूमची लागवड करण्यात आली आहे.
एका महिन्याच्या आत मशरूम उत्पादन घेणारे रायसिंग वसावे यांनी प्रथम उत्पादन 4500 रुपये हुन अधिक ताजे मशरूमची विक्री देखील केली आहे.
मशरूम बॅग मधून तीन ते चार टप्प्याने निघतात त्याच्यात पहिल्याच टप्प्यात एवढं उत्पन्न घेतले आहे.
तसेच पुनर्वसन गावात एवढेच नाही तर सातपुड्यातील अनेक गावात मशरूम शेती करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.
सोबतच मशरूम सेवनाचे आरोग्याला अनेक फायदे होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेजारील राज्य गुजरात मध्ये व वेगवेगळ्या बाजार पेठ मध्ये फ्रेश मशरूम ची मागणी वाढत आहे.