Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्फाबेट स्कूल मोलगी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिवस निमित्त अभिवादन

मोलगीच्या अल्फाबेट स्कूल मध्ये महापरीनिर्वाण दिवस साजरा
मोलगी  दि ६(प्रतिनिधी)
  अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल व ग्रामविकास मंडळ संचलित कै. बी. एस. सैंदाणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महापरीनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मोलगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावीत व अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रवीण चौधरी होते तर व्यासपीठावर दिलीपदादा वसावे, बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी, प्रा. डी. के. वसावे, प्रा. रविंद्र वानखेडे प्रा. विनोद कुंवर होते.
             कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी यांनी केली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावीत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले व लहान बालकांचे कौतुक करत सुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रा. डी. के. वसावे, प्रा. रविंद्र वानखेडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
                   या कार्यक्रमासाठी दिलीपदादा वसावे, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. विनोद कुंवर, प्रा. दिनेश प्रजापती, प्रा. मनोज चौरे, समाधान महाजन, सुभाष पाडवी व अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षिका लीला पाडवी, मनीषा वसावे, हीराबाई वळवी, पोलिस हवालदार दिलवरसिंग पाडवी, पोलिस कॉन्स्टेबल राहुल महाले ॲड.दिनेश वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अल्फाबेट स्कूलचे मुख्याध्यापक गोटूसिंग वळवी यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी केले.