Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर इडी, सीबीआयची एक कारवाई दाखवा व एक लाख रुपये बक्षीस मिळवा - राष्ट्रवादीचे खुलेआम चॅलेंज

तळोदा दि ३१( प्रतिनिधी) लोकशाही असलेल्या देशात भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर इडी, सीबीआय ने एक सूद्धा कारवाई केली असल्यास दाखवा व एक लाख रुपये बक्षीस मिळवा अशा आशयाचे फलक राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी शहरातील गजबजलेल्या स्मारक चौकात लावुन भाजपाच्या नेत्यांना आव्हान दिले आहे.         
            राज्यात मविआच्या कार्यकर्त्यांवर इडी - सीबीआय ची चौकशी सुरू आहे.भाजप सरकार देशात विरोध पक्षातील नेत्यांना इडी व सीबीआय च्या ससेमिरा लावून जेरीस आणते.जे जे या प्रकरणात गुरफटले जातात ते कारवाईच्या भितीपोटी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात.विरोधी पक्षातील नेत्यांवर इडीची कारवाई झाली की,ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात.

            अशा घटना व त्यातील चर्चा लक्षात घेऊन तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी भाजप शासनाला आव्हान देत स्मारक चौकात फलक लावले आहे.जे भाजपात आहेत,ज्यानी भाजपात प्रवेश केला.अश्यांवर इडी व सीबीआय ची कारवाई झाल्याचे दाखवा व एक लाख रुपये बक्षीस मिळवा असे आवाहन केले आहे.यामुळे शहरात चर्चेचा विषय ठरला असुन,या आव्हानाला कोण सामोरे जातो,एक लाख रुपये बक्षीस कोणाला मिळणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.