पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा घडला ठिकाण ललित लल्लु धानका वय ३४ धंदा- मजुरी रा. दलेलपुर ता. तळोदा जि. नंदुरबार यांचे राहते घरात दलेलपुर ता. तळोदा जि. नंदुरबार येथे दि. २८/०१/२०२ ४ रोजी ०९/३० ते ०२/०० वा. चे दरम्यान गुन्हा घडला आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत गुन्हयाचे कारण :- मजुरीच्या कारणावरुन कुरापत काढुन.
अशोक मदन धानका वय- ४५ धंदा- मजुरी रा. दलेलपुर ता. तळोदा जि. नंदुरबार यांस ललित लल्लु - धानका वय ३४ धंदा- मजुरी रा. दलेलपुर ता. तळोदा जि. नंदुरबार याने लोंखडी फावडाने मारुन जिवे ठार केले.
यातील घटनेतील मयत अशोक धानका यांना ललित धानका याने त्याच्या घरी घेवुन जावुन त्यांना दारु पाजुन त्या दोंघामध्ये दोन महिन्यापुर्वी मजुरीच्या कारणावरुन झालेल्या भांडणाची कुरापत काढुन मयत अशोक धानका त्यांचे डोक्यात लाकडी दांडका असलेला लोखंडी फावडा मारुन त्यांना गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारले आहे.घटनास्थळी खाटेवर पडलेले केस,खाटेवरच्या गोफलेल्या नायलॉनच्या दोन पटया त्यावर रक्ताचे डाग, एक पिवळया रंगाचे गोल गळयाचे टि शर्ट गळयाखाली रक्ताचे डाग लागलेले,एक आकाशी रंगाचा बारीक चौकटी असलेला कापड त्यावर रक्ताचा डाग,लाकडी दांडा असलेला दोन फुट लांबीचा फावडा. त्याचे पाते लोखंडी असलेले मिळून आले आहे.
कृष्णा अशोक धानका वय-२३ धंदा- मजुरी रा. दलेलपुर ता. तळोदा जि. नंदुरबार याने दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हणुन भादवी कलम ३०२ प्रमाणे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोनि / राजेंद्र जगताप करीत आहेत.