Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वैद्यकीय क्षेत्रातील देवदुत डॉ महेंद्र चव्हाण यांचा आरोग्य सेवेतील कार्याचा शासकीय गौरव,जनतेत समाधान व्यक्त

तळोदा दि २७ (प्रतिनिधी) डॉ महेंद्र चव्हाण हे नंदूरबार जिल्ह्यात तळोदासाठी कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून लाभले आहेत.त्यांचा कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजमनात ठसला आहे.नोकरी म्हणून कार्यरत असले तरी रक्तांत समाजसेवक म्हणून सतत परीचय देतात.अहोरात्र रुग्णांसाठी उपलब्ध असतात,नाही, अशक्य,असे शब्द त्यांचा तोंडुन कधी ऐकायला मिळाले नसल्याचे गरीब, गरजू, अडचणीतले रुग्ण नेहमीच बोलुन दाखवतात.महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद नंदुरबार तर्फे लक्ष्य ८४ दिवस या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ महेंद्र चव्हाण यांचा सत्कार म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक कार्य करणाऱ्यांचा यथोचित गौरव आहे.
           मा. सीईओ जि. प. नंदुरबार श्री. सावन कुमार साहेब यांनी मिशन 84 दिवस बाबत पडताळणी साठी आरोग्य वर्धिनी केंद्र सोमावल येथे भेट दिली. OPD तसेच IPD तील दाखल रुग्णांसोबत संवाद साधला. दैनंदिन कामकाज, प्रसूतीगृह, परिसर याबाबत पाहणी केली. मिशन 84 दिवस बाबत आशांचा आढावा घेतला. मा. सीईओ सरांनी आरोग्य वर्धिनी केंद्र यांच्या कामाबद्दल खूप समाधान व्यक्त केले व मा. वैद्यकीय डॉ महेंद्र चव्हाण व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले होते.
            डॉ.हेमंत बोरसे ,सहसंचालक आरोग्य सेवा,मुंबई यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली तेव्हा आयुष्मान भव कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता,0 ते 5 वयोगटातील बालक व गरोदर माता,स्तनदा माता यांची तपासणीचा आढावा घेतला गरोदर माता यांना iron sucrose injection (रक्त वाढीचे)सलाईन द्वारा देणे या सेवा.तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णाची उपस्थिती व उत्कृष्ट आरोग्य विषयक कार्यक्रम बघून त्यांनी कौतुक केले.व अतिशय उत्तम कार्य करीत असल्याचा शेरा दिला होता.
तसेच डॉ.नरेश पाडवी,जिल्हा शल्य चिकित्सक,नंदुरबार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सोमावल येथे प्रसूती चे प्रमाण अधिक असून उत्तम सेवा मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले.
सदर भेटी दरम्यान डॉ.महेंद्र चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी यांनी दौरा नियोजन करून तालुक्यातील आरोग्य कार्यक्रम बाबत आढावा सादर केला. जिल्हा स्तरीय अधिकारी डॉ.संदीप पुंड व डॉ.अमितकुमार पाटील उपस्थित होते.