Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उधना,सुरत (गुजरात) श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळांच्या वतीने हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न

उधना,सुरत श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळांच्या वतीने हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न
सुरत दि३०(प्रतिनिधी)  २१ जानेवारी २०२४  रविवार रोजी श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळ, उधना, सुरत, गुजरात च्या वतीने श्री क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालयात
*हळदी-कुंकू* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज तसेच  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व भगवान श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला मंडळाच्या सदस्या सौ.जागृती गुणवंत माळी यांनी केले. याप्रसंगी सर्व समाज भगिनींनी एकत्र येत एकमेकांना हळदी-कुंकू करून हिंदू संस्कृतीची जपवणूक केली. तसेच सदर कार्यक्रमा अंतर्गत महिलांनी उखाणे घेण्याचा कार्यक्रम व लकी ड्रॉ मार्फत विजेता महिलेला साडी सप्रेम भेट देणे इत्यादी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे समाजातील ज्येष्ठ महिलांनी समाज प्रबोधनात्मक विचारांची  मांडणी करून समाज प्रबोधन केले. तसेच महिलांचा सामाजिक कार्यामध्ये जास्तीत-जास्त सहभाग वाढावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमात महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ.लताबाई विठ्ठल महाजन यांनी आतापर्यंतचा महिला मंडळाचा विकासात्मक कार्याचा(उपक्रमांचा)तसेच आर्थिक व्यवहाराचा (आवक- जावक)अहवाल सर्व समाज भगिनींना वाचून दाखविला.  याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उधना,सुरत श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश गंभीर महाजन उपाध्यक्ष श्री भिकन दगा महाजन सेक्रेटरी प्रा.श्री विलास देवाजी माळी,सर खजिनदार श्री.अशोक तानाजी महाजन सदस्य श्री.संतोष खंडू महाजन सदस्य श्री.पुंडलिक मोतीलाल महाजन समाज बांधव श्री.संजय तुकाराम महाजन श्री राम किरण राणे,सर यांची  उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा गं.भा. विमलताई तुकाराम महाजन उपाध्यक्षा सौ. संगिता कैलास महाजन सेक्रेटरी सौ.लताबाई विठ्ठल महाजन सहसेक्रेटरी सौ.विमलबाई जगन्नाथ महाजन खजिनदार गं.भा.आशाबाई शिवदास महाजन उपखजिनदार सौ. सुनंदाबाई लक्ष्मण महाजन  सदस्या सौ. ठगुबाई युवराज महाजन सदस्या सौ.मंगलबाई आत्माराम महाजन सदस्या सौ. कलाबाई संतोष महाजन सदस्या सौ.सुलोचनाबाई मधुकर महाजन सदस्या सौ.नकुबाई कृष्णा  महाजन सदस्या सौ.जागृती गुणवंत माळी सदस्या सौ. चंद्रकला विकास महाजन  सदस्या गं.भा. ज्योती सुनिल महाजन सदस्या सौ. ललिता विलास महाजन सदस्या सौ. सुनिता रामदास महाजन सदस्या सौ.प्रतिभा संजय महाजन सदस्या सौ.वैशाली महेंद्र महाजन सदस्या सौ. प्रतिभा एकनाथ महाजन सदस्या सौ. ज्योती मधुकर माळी सदस्या सौ. ज्योती सोनू महाजन सदस्या सौ. दिपाली विश्वास माळी सदस्या सौ. योगिता संजय महाजन सदस्या सौ.पुष्पा दिनेश शेलकर सदस्या सौ.पुनम प्रमोद माळी सदस्या सौ. शारदा मोतीलाल माळी सदस्या सौ. प्रतिभा राजेंद्र महाजन सदस्या सौ. सुरेखाबाई उखा महाजन सदस्या सौ. रत्नाबाई कैलास महाजन सदस्या सौ. रत्नाबाई भिकन महाजन सदस्या सौ.सुरेखाबाई विनोद महाजन यांनी परिश्रम घेतले.तसेच सदर कार्यक्रमाला समाजातील सर्व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली व सहकार्य केले.त्याबद्द्ल श्री क्षत्रिय काच माळी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा गं.भा. विमलताई तुकाराम महाजन व मंडळाचे उपाध्यक्षा व कार्यकारी सर्व सदस्या यांनी महिला माता- भगिनींचे आभार मानले.तसेच सुरत श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाचे  उपाध्यक्ष श्री भिकन दगा महाजन व सेक्रेटरी प्रा.श्री विलास देवाजी माळी,सर यांनी महिला मंडळाने आतापर्यंत अनेक समाज विकासात्मक कार्यात आपला प्रत्यक्ष उत्स्फुर्त सहभाग नोंदवून वेळोवेळी सुरत श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळाला स्वयंपाकाची भांडी,ओला मसाला दळण्यासाठी इलेक्ट्रीक चक्की, साऊंड सिस्टम,बसण्यासाठी खुर्च्या इत्यादी विविध साधने घेण्यासाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक व पुढील सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन तसेच आभार आपल्या मनोगतातून केले. शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करून कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व समाज बंधू-भगिनींचे महिला मंडळाच्या वतीने विशेष आभार  महिला मंडळाच्या सदस्या सौ.चंद्रकला विकास महाजन यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून मानले.

*✍️लेखन -* 
*प्रा.श्री विलास देवाजी माळी,सर*
*सेक्रेटरी- श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा* *मंडळ,उधना,सुरत, गुजरात.*
*मो.नं.6353903295*