तळोदा दि २९(प्रतिनिधी) शिवसेना (उबाठा) तर्फे मातोश्री जिजाबाई जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णासाठी घरपोच मोफत रिक्षा सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
या मोफत रिक्षामुळे रुग्णांची पायपीट थांबून त्यांना दिलासा मिळणार आहे उद्घाटक म्हणून आमदार आमश्या पाडवी हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) उदेसिंगदादा पाडवी, बाजार समिती उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, जिल्हा नियोजन समिती सदस्य निखिल तुरखिया, जिल्हा उपप्रमुख आनंद सोनार, उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील, खरेदी-विक्री संघ संचालक संजय पटेल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप परदेशी, शहराध्यक्ष योगेश मराठे, ललित जाट,लक्ष्मण वाडीले,सुरज माळी,बच्चुसिंग परदेशी,विलास कर्णकार,उपस्थित होते
.याप्रसंगी आ.आमशादादा पाडवी यांनी, रुग्णवाहिका व रिक्षाच्या माध्यमातून शहरात शिवसैनिकांकडून नेहमी गरजू लोकांची सेवा केली जाईल. या सुविधेच्या माध्यमातून एका रुग्णाचे जरी प्राण वाचवले तरी त्याचे सार्थक होईल, असे सांगितले. अरुण चौधरी यांनी, शिवसेना समाजकारणाला अधिक महत्त्व देते, असे ते म्हणाले. शहरप्रमुख दुबे यांनी रिक्षा संकल्पना मांडली. येथील उपजिल्हा रुग्णालय ते घरापर्यंत ये-जा करणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसू नये व पायपीट करावी लागू नये यासाठी ही रिक्षा मोफत रुग्णांना घरपोच सेवा देईल.असे स्पष्ट केले.कार्यक्रमातयावेळी शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या.