Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या यूवा जिल्हाध्यक्षपदी तळोदा येथील संदीप गोपालदास परदेशी यांची निवड

तळोदा दि २९ (प्रतिनिधी) नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी तळोदा येथील संदीप गोपालदास परदेशी यांची निवड करण्यात आली.या निवडीने तरुणांमध्ये उत्साह संचारला असुन फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
                 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुंबई येथे पद्मविभूषण , राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील ,युवकांचे प्रेरणास्थान मेहबूबभाई शेख,महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथरावजी खडसे आणि नंदूरबार जिल्हा नेते माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग दादा पाडवी यांच्या आशीर्वादाने संदिप परदेशी यांची नंदुरबार राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

याबाबत श्री परदेशी म्हणाले,शुभेच्छांच्या वर्षाव इतका होता की मला लोकांची आणि आपली सेवा करण्यात एक वेगळाच उत्साह व उत्तेजना निर्माण झाली,नक्कीच येत्या काळात मी या संधीच्या सोनं करण्याचा अतोनात प्रयत्न करत ह्या पदाला न्याय देण्याचे काम करेल लोकांच्या आणि युवकांच्या समस्या खंबीरपणे वेळोवेळी मांडत राहील व पक्ष वाढीसाठी तन मन धनाने काम करण्याची ग्वाही दिली.