येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पाडवी सोबत माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सुर्यवंशी, नारायण ठाकरे, श्याम राजपूत, प्रा.विलास डामरे, जगदीश परदेशी, किरण सुर्यवंशी, राजू गाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पाडवी यांनी विकास कामांचा आढावा सांगितला ते पुढे बोलताना म्हणाले की, सुरुवातीला निधी मिळण्यास अडचणी येत होत्या मात्र आता शिंदे, फडणवीस व पवार असे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारात कामे झपाट्याने होत आहेत. त्यास केंद्र सरकारचा मोठा हातभार लाभत आहे. शहादा व तळोदा पालिका प्रशासक आहे. त्यामुळे दोघे तालुक्यातील पालिका विकास कामांची जबाबदारी आहे. शहराची हद्दवाढ झाली त्यात २४ कोटीचा निधी प्राप्त झाला होता त्यातून विकास कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन अंतर्गत ११० कोटी निधी मिळाला आहे. नगरोत्थान योजने अंतर्गत २८ कोटी मंजूर झाले असून त्या माध्यमातून राजपथ रस्ता तयार केला जात आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटणार आहे. बायपास रस्ताचे काम गतीने सुरू आहे. १९८६ चा डीपी रस्ता असल्याने त्यात तात्काळ बदल करणे सोपे नाही, शेतकऱ्यांना विनंती करून मदतीचे आवाहन करून रस्ते काम सुरू आहेत त्यात शेतकरी मदत करत आहेत. या रस्त्यावर स्पीकर सुविधा, ओपन जिम, स्ट्रीट लाईट, वृक्ष लागवड केली जाणार आहे. आगामी २-३ महिन्यात या रस्त्यावरील काम पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे शहराचा विकासात भर पडणार आहे.
विद्युत वितरण विभाग कार्यालय मागील रस्ता साईबाबा मंदिरा जवळील रस्ता यासह शहरातील विविध रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणचे होणार आहेत. शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून निर्माण होणार आहेत. बस स्थानकांवर मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार आहे.
शहरातील ग्रामदैवत कालिका मातेचा यात्रेसाठी जागा शिल्लक राहिली नाही, कालिका माता मंदिर पाठीमागे असलेली खर्डी नदी शुध्दीकरण करून त्यात पाण्याचा निचरा होणेसाठी मोठे पाईप टाकून घाट बनवण्याचा नियोजन आहे. याच भागात महिला शौचालय असलेल्या ठिकाणी पुल बनविणे पथदिवे लावणे असे ५ कोटी रुपयाचे नियोजन आहे. त्यात पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर असून महिन्या भरात कामे सुरू होणार आहे. त्या कामाना मंजुरी मिळाली आहे.
शहरातील तीर्थ क्षेत्र कनकेश्वर मंदिर यासह अन्य ठिकाणी एक मार्ग पथ तयार केले जाणार आहेत ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्याकरिता पर्यटन विभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. शहरातील जुने रस्ते नवीन बनविण्याचा संकल्प आहे. पाणी पुरवठा योजना मंजूर कामे गतिमान सुरू आहे. हद्द वाढीत आलेल्या भागाचा विकास होणार आहे.
अश्वस्थामा तीर्थक्षेत्र विकासासाठी पायऱ्या घाट बनविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत संत गुलाम महाराज समाधी स्थळ ४ कोटी चाळीस लाख रु निधीतून संभा मंडप, १९ संडास बाथरुम, किचन रूम, गाव अंतर्गत रस्ते पेव्हर ब्लॉक असा विकास केला जाणार आहे.
पूर्ण मतदार संघ सिंचनखाली आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला .३ धरणाचे काम लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होनार आहे.नदी नाल्यांची पाहणी केली आहे. प्रत्येक गावाजवळ कोरड शेती आहे अश्या ठिकाणी पाणी थांबविण्यासाठी उपाययोजना करणार आहे. खाजगी सर्वेक्षण करून जास्तीत जास्त शेती ओलितास कशी येईल यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या करीता ३३ कोटी व गोमाई नदिसाठी ५५ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. संपूर्ण पाणी परिसरात फिरवून शिरपूर पॅटर्न राबवून शेती सिंचन करण्याचे माझे स्वप्न मी पूर्ण करणार आहे.
सबस्टेशन ७ मंजूर केले आहेत त्यापैकी ३ पूर्ण झाले आहेत. ४ प्रगती पथावर आहेत. लोडशेडींग ची विभागणी करून प्रत्येक शेत्रात स्वतंत्र रोहित्र प्राप्त करून दिले जाणार आहेत.