राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अपेक्षित बदलाचा अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीगत करन्यासाठी संपूर्ण राज्यभर वैविध्यपूर्ण उपक्रमाची अमलबजावणी केली जात आहे. अध्यपणात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापर करून अध्ययन, अध्यापन प्रक्रिया अधिक सोपी व्हावी या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी तळोदा तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांच्या नववी व दहावी च्या सर्व शिक्षकांनी लाभ घेतला. एकूण तीन दिवस चालण्याऱ्या या प्रशिक्षणास तज्ञ मार्गदर्शक म्हणून विजय चव्हाण, श्रीमती शितल पाडवी, अशोक महाले, रघुवीर सिंह कुवर, पंडित वळवी, जितेंद्र चौधरी, विजय अहिरे, विलास मगरे, मेघश्याम धनगर, कांतीलाल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणानाचे समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मगरे यांनी केले, मेघश्याम धनगर यांनी आभार मानले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी तळोदा तालुका गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर,यांचे मार्गदर्शन व मनोज पाटील, मिलिंद देसले, शकील काझी यांचे सहकार्य लाभले.