Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोटारसायकल व मालवाहु टेम्पोचा धडकेत एक जण तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना

 तळोदा दि.२९ (प्रतिनिधी)  बोरद आमलाड रस्त्यावर मोटारसायकल व मालवाहु टेम्पोचा धडकेत एक जण तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत तळोदा पोलिसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
              याबाबत शंकर सुरेश पाडवी वय- ४२ व्यवसाय- भाजीपाला विक्री रा. गुंजाळी ता. तळोदा जि. नंदुरबार याने फिर्याद दिली असून आरोपीत मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची मालवाहु टेम्पो क्र. MH- ३९ AD- १९६० या गाडीवरील चालक नाव गाव माहित नाही.
           गुन्हयाची थोडक्यात माहिती अशी, मोटार अपघातातील मयताचे नाव जगदिश शंकर पाडवी रा. गुंजाळी ता. तळोदा जि. नंदुरबार. दुखापती अक्षय सोमनाथ ठाकरे रा. गंजाळी ता. तळोदा दि २६ तारखेस  बोरद आमलाड रस्त्यावर उमरी फाट्याचा वळणावर फिर्यादी यांचा मुलगा जगदिश व त्याचा मित्र अक्षय याचे मालकीचे मो. सा. क्र. MH- ०४ JC- ५०८२ या गाडीने गुंजाळी येथुन मोरवड येथे देव दर्शनाकरीता जात असतांना बोरद ते तळोदा कडे जाणारे रोडवर उमरी गावाजवळ वळणावर समोरुन येणारी मारुती सुझुकी कंपनीची मालवाहु टेम्पो क्र. MH- ३९ AD- १९६० या गाडीवरील चालक नाव गाव माहित नाही याने भरधाव वेगाने वाहन चालवुन रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अविचाराने हयगयीने चालवुन फिर्यादी यांचा मुलगा जगदिश याचे मरणास व त्याचा मित्र अक्षय यांचे दुखापतीस व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला व पोलीसांना खबर न देता पळुन गेला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरनं. ११७/२०२४ | भादंवि ३०४ कलम (अ), २७९,३३८,३३८,४ २७ सह मो. वा. का. क. १८४,१३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस महेश निकम करीत आहेत.