स्वातंत्र्यसेनानी, प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कूल व श्री शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदाचे विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक देवयानी किरण सोनार 21000 रुपये व प्रमाणपत्रद्वितीय क्रमांक शारदा गुलाबसिंग पाडवी 11000 रुपये व प्रमाणपत्र यांना मिळाले .
यशस्वी विद्यार्थ्यांचे सौ.मंगलाताई अरुणकुमार महाजन(अध्यक्षा अ.शि.म.धुळे), अरुणकुमारजी महाजन (चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी अ.शि.म.धुळे.संचालक काॅलेज ट्रस्ट तळोदा), यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यालयाचे प्राचार्य अमरदीप अरुणकुमार महाजन,
प्रा. बी.जी. माळी सर (उपमुख्याध्यापक) इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्य सौ. शितलताई अमरदीप महाजन , वरिष्ठ लिपिक डी.पी. महाले, प्रा. ए.एल. महाजन(पर्यवेक्षक),ए.आर.सुर्यवंशी (पर्यवेक्षक) यांनी कौतुक केले आहे,
तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले,सदर विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक संकेत माळी, अमरसिंग वसावे,
अमोल टवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.