Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मा.योगेशभाऊ चौधरी यांच्या वाढ दिवसानिमित भव्य रक्तदान शिबीर, रुग्णांना सकस आहार वाटप, राज्यस्तरीय नेत्यांची हजेरी

योगेश चौधरी यांच्या वाढ दिवसानिमित भव्य रक्तदान शिबिर संपन्न

तळोदा दि ४ (प्रतिनिधी) येथील येथील मनुदेवी श्री.मनुदेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रभाकर चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
            रक्तदान शिबीरात 509 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून नंदुरबार जिल्ह्यात रक्त संकलनाच्या नवीन विक्रम नोंदवला आहे.दरम्यान 11 वाजता जिल्हा रुग्णालय तळोदा येथे रुग्णांना महाकाल ग्रुप तर्फे फलहाराचे वाटप करण्यात आले.धुळे येथील नवजीवन रक्त संकलन पेढी तथा नंदुरबार येथील जनकल्याण रक्त संकलन पेढी यांनी रक्त संकलनाचे काम केले. यावेळची नियोजनाची सर्व सूत्र स्वतः योगेश चौधरी यांच्या सुवेद्य पत्नी माजी उपनगराध्यक्षा सौ.भाग्यश्री चौधरी यांनी केले.
        सकाळी रक्तदान शिबीराची सुरुवात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित,भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, आमदार राजेशदादा पाडवी,तैलिक समाज तळोद्याचे अध्यक्ष प्रभाकरजी संभू चौधरी,ज्येष्ठ संचालिका सौ.रत्नाताई चौधरी यांच्या हस्ते फीत कापून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. दरम्यान कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांनी योगेश चौधरी यांचे अभिष्टचिंतन केले . यावेळी आदिवासी विकास मंत्री मा.नामदार विजयकुमार गावित यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून अभिष्टचिंतन सोहळा व रक्तदान शिबिराला भेट दिली .यावेळी अमळनेर विधानसभा चे माजी आमदार शिरीष चौधरी,माजी नगराध्यक्ष अजय परदेशी,माजी नगराध्यक्ष जगदीश चौधरी,रामचंद्र चौधरी,दिपक चौधरी, भाजपाचे तळोदा शहादा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी,प्रदेश किसान मोर्चाचे राजेंद्रसिंह राजपूत,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील,माजी युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पाटील,भाजपा नेते विक्रांत मोरे,चारुदत्त कळवनकर,डॉ.दर्शन चौधरी, मंदार चौधरी,जिल्हा कक्ष प्रमुख महेश चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष हेमलाल मगरे, शिरीष माळी,रुपसिंग पाडवी,माजी तालुकाध्यक्ष प्रा.विलास डामरे,जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, संचालक कल्पेश चौधरी,तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी,दरबारसिंग पाडवी,नारायण ठाकरे,महिला अध्यक्ष रसिलाबेन देसाई, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे,जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक चौधरी,माजी नगरसेवक संजय माळी, माजी स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी ,शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र दुबे,आनंद सोनार,राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष योगेश मराठे, माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय , प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ढोल ताशाच्या गजरात सोहळा स्थळी येऊन अभिष्टचिंतन केले. रक्तदान शिबिरात योगेशभाऊ मित्र परिवाराकडून या उपक्रमात 509 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानाचे समर्पण करत नंदुरबार जिल्ह्यात सर्वात जास्त रक्त संकलन केल्याबद्दल विक्रम नोंदवला आहे अशी प्रतिक्रिया रक्तपेढीचे संचालक सुनील चौधरी व डॉक्टर लालचंदाणी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी रक्तदात्यांना उत्तम प्रतीचे प्रत्येकी दोन भेट वस्तू देण्यात आल्या.उपक्रम यशस्वीतेसाठी योगेशभाऊ चौधरी मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.