नंदुरबार- २ जिजामाता शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नंदुरबार येथे दि.२/२/२०२४ शुक्रवार रोजी मशरूम फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. या मशरूम फेस्टिवल मध्ये राजेंद्र राजेंद्र वसावे, लीलाताई वसावे, किरताताई वसावे, इंदिराबाई वसावे, वंताबाई वसावे, यांच्या अस्तंबा मशरूम उत्पादक, कोलपासा मशरूम उत्पादक, नवनिर्माण मशरूम उत्पादक, तसेच दिलीप वळवी, भगतसिंग वळवी, यांच्या काकडदा मशरूम उत्पादक, अशा अनेक मशरूम संस्थानी भाग घेतला होता.
या मशरूम फेस्टिवलचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे, मा.सचिव डॉ. अभिजीत मोरे, मा.उपाध्यक्ष डॉ. विक्रांतजी मोरे,मा.ऍड.राऊबाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सतीश देवरे यांनी पारंपरिक शेतीला पर्याय व सेंद्रिय शेतीला प्रेरणा मिळावी म्हणून या मशरूम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पेहराव वेशभूषा करून व्यवसाय करून ग्राहकांना कशाप्रकारे आकर्षित केले जाते हे विशेष मार्गदर्शन मशरूम उत्पादन घेणाऱ्या आदिवासी महिलांना केले. आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्वच मशरूम उत्पादकांनी साक्री, पिंपळगाव बसवंत, नाशिक अशा अनेक ठिकाणाहून आलेल्या जिज्ञासू शेतकऱ्यांना मशरूम शेती अत्यंत कमी लागवडीत किती फायदेशीर ठरते याचे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले
.
.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिजामाता कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ विलास पंडित, तर आभार प्रा. डॉ. एच एम पाटील यांनी मानले.