नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शुभांगी ताई पाटील चा नम्रता पुर्वक आवाहन
सर्वप्रथम आपण मागील वर्षी झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत माझ्या सारख्या सामान्य घरातील शिक्षिके वर विश्वास दाखवून सुमारे 49 हजार एवढे भरघोस मतदान दिले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते.
आपला हाच विश्वास मला अल्पशा पराभवानंतर देखील शिक्षकांसाठी चे काम करण्यासाठी ऊर्जा देत राहिला. आपणा सर्वांचे प्रेम व विश्वासावर खरे उतरण्यासाठी शिक्षकांचे सर्व प्रकारचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी व शिक्षकांची बाजू भक्कमपणे सदनात मांडता यावी यासाठी पुन्हा एकदा आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 मध्ये मी उमेदवारी करत आहे.
पण त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्व शिक्षकांचे आशीर्वाद मला आवश्यक आहेत व हे आशीर्वाद नक्की मलाच मिळतील ही केवळ खात्री नाही तर शंभर टक्के विश्वास आहे. आपल्या याच आशीर्वादा च्या बळावर मागील दहा वर्षापासून मी करत असलेले शिक्षकांसाठी चे काम यापुढेही असेच अविरत रात्रंदिवस चालूच राहील फक्त आवश्यकता आहे ती आपल्या भक्कम पाठिंब्याची व आपल्या साथीची! व आगामी निवडणुकीत ती साथ तुम्ही मला द्यावी ही एक लहान बहीण म्हणून हक्काने तुमच्याकडे एक माहेरची साडी म्हणून मागणी करत आहे व ती साथ भक्कमपणे द्यावी यासाठी पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करते.
आपली कृपाभिलाशी बहीण
शुभांगी ताई पाटील