धडगाव - कोठार रस्त्यावर धडगाव कडून गहू तांदूळ भरुन येणारा आयशर ट्रक असा ९,६१,४५० रुपये माल जप्त करण्यात आला आहे.
दि १७ रोजी सदर ट्रक धडगावहुन तळोदाकडे येत असताना पकडण्यात आला. ट्रक चालकाकडे संबंधित मालाची विचारपूस केली असता त्याकडे कुठलेही धान्य बिल, किंवा पोहच करण्याचे ठिकाण आढळून न आल्याने काळ्या बाजाराची वाहतूक करत असल्यानचे निष्पन्न झाल्याने आयशर ट्रक जप्त करुन तळोदा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला.
आयशर ट्रक क्रमांक एमएच १५ डी के १४९७ यात ७३,७०० रुपये किंमतीचा ६७ कट्टे ३३.५० किलो वजन असलेला गहु व ८७,७५० रुपये किंमतीचा ६५ कट्टे ३२.५० किलो वजन असलेला तांदुळ आयशर किंमत ८,००,००० रुपये असा एकुण ९,६१,४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तळोदा पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात दि.१८ रोजी चालक भिका गुलाबसिंग ठाकरे रा.निगदी ता. धडगाव जि. नंदुरबार तसेच चालकाचा मदतनीस आकाश दिलीप ढोले रा. वडफळ्या ता. धडगाव जि. नंदुरबार यांच्या विरोधात तळोदा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचा माल काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असताना कोठार गावाच्या रस्त्याच्या उतारावर रणजित पराडके यांच्या घरासमोर धडगाव तळोदा रस्त्यावर मिळुन आला.नेमका गहु, तांदुळ कोणत्या ठिकाणी काळ्या बाजारात जात होता? याबाबत तपास करीत आहेत,गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप करीत आहेत.