फिर्यादी तेजाबसिंग पाडवी, स्थानिक गुन्हे शाखा - नंदूरबार, यांनी आरोपी रविंद्र डुमकुळ, रा ता तळोदा व इतर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे तळोदा, येथे भा. द. वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम २६ ,३० प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी की, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर आरोपींच्या दुकानात छापा टाकण्यात आला होता. आरोपी यांचे दुकानात प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण करून ठेवलेला होता. पोलिसांनी विचारणा केली असता इतर आरोपींचे नाव सांगण्यात आले होते. सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करून पंचनामा करण्यात आला होता. अर्जदार रविंद्र डुमकुळ, रा ता तळोदा, यांनी सदर गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालय शहादा येथे फौजदारी जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू, सत्र न्यायालय शहादा यांनी सदर फौजदारी जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध अर्जदार यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद
( न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी) यांनी दिनांक २७.०२.२०२४ रोजीच्या आदेशान्वये अटी व शर्तीसह अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत. अर्जदारातर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.