सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि १
महाराष्ट्राचे विधान सभा व विधान परिषदेचे अधिवेशन सुरू आहे.यांत राज्यभरातील लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील व आपल्याला ज्ञात असलेले प्रश्न मांडतात,त्यावर चर्चा होते, संबंधित विभागाचे मंत्री त्यावर उत्तर देतात,काय केले,काय करणार याबाबत माहिती पुरवली जाते.मात्र हल्ली सुरु असलेल्या अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी (उबाठा) यांना सभापती यांनी बोलायला परवानगीच दिली नाही, त्यामुळे ते संतप्त होऊन सभागृहातील खुर्ची सोडून वेल मध्ये खाली बसून सभापतींचे लक्ष वेधत सभापतींचा कार्यप्रणाली बहिष्कार टाकला.
मला माझ्या जिल्ह्यातील आरोग्याची दुरावस्था, बालमृत्यू, कुपोषण, आदिवासी विभागाचा निधी , देहली धरण,शबरी घरकुल, बिरसामुंडा गाव पाडे जोडरस्ता याबाबत सभागृहात बोलायचे आहे.दोन दिवसांपासून सभापतींकडे वेळ मागत आहे मात्र पाच मिनिटेही वेळ मला देण्यात आला नाही.मी आदिवासी आमदार आहे व विरोधी पक्षाचा असल्याने माझ्या अधिकाराचे हनन केले जात आहे.
नागपूर अधिवेशनात मी विचारलेल्या प्रश्नांचे काय झाले याबाबत अद्याप खुलासा नाही,या सभागृहात मी एकमेव आदिवासी आमदार असल्याने मला अशी वागणूक सभापती देत असल्याचा आरोप आमशादादा पाडवी यांनी माध्यमांसमोर केला आहे.