छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम येवला येथे संपन्न झाला.
येथील, स्वातंत्र्यपूर्व काळा पासून गेल्या 82 वर्षापासून येवले शहरांमध्ये मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा केला जातो, आज, तिथी नुसार ऐतिहासिक शिवजन्मोत्सव समिती पाटोळे परिवार येवला यांच्या वतीने समिती चे प्रमुख माजी नगरसेवक सुभाषराव पहिलवान पाटोळे, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी मनोगत व्यक्त करून, विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रावणदादा जावळे, किशोर परदेशी, राजेंद्र भंडारी, किशोर सोनवणे,दत्ता महाले , बंडू पैलवान क्षीरसागर, सुधाकर तात्या पाटोळे, रमेश मामा भावसार, आनंद शिंदे, दत्ता नागडेकर , सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर साताळकर, बाजीराव सस्कर, दौलतराव कदम नाना, स्वाभिमानी सेना नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, धिरज परदेशी, बंडू भिंगारकर,युवराज पाटोळे, मीननाथ पवार, दिनेश परदेशी,चेतन धसे, अमित मेहता, सुभाष साळवे, चंपालाल उपासे, राजेंद्र कुकर, बाळा गवते, संजय पाटोळे, संग्राम पाटोळे, पृथ्वीराज पाटोळे, गणेश पाटोळे, चंगू दादा पाटोळे, निलेश परदेशी, मयूर कायस्थ , संतोष नागपुरे, सम्राट कापडी, विठू माळोकर, माणिकलाल टाक, विजय पाटोळे, गणेश चव्हाण, गोकुळ पाटोळे, किशोर सावजी, गणेश सोनवणे, गणेश राऊत, आदींसह समितीचे सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.