Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुष्पा स्टाईल (चोर कप्प्यात) मद्य वाहतूकीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुसक्या आवळल्या, अवैध मद्यासह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

पुष्पा स्टाईल (चोर कप्प्यात) मद्य वाहतूकीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुसक्या आवळल्या, अवैध मद्यासह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

नाशिक सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि ३१
          हॉटेल दुर्गा गार्डन समोर नाशिक देवळा रोडवर, रामेश्वर शिवार येथे राज्य उत्पादन शुल्काच्या मालेगाव विभाग पथकाने शनिवारी दि ३० रोजी विदेशी दारु वाहनासह पकडली. या कारवाईत २३ लाख १३ हजार ८० रुपये किंमतीचा महाराष्ट्रात  वाहतुकीस व विक्रीस प्रतीबंधीत असलेला मद्य वाहतूक करताना जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनचालक ओमप्रकाश हिरालाल यादव याला अटक करण्यात आली. सदर वाहनचालक तसेच गुन्हयातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहनमालक यांचे विरोधात  महाराष्ट्र प्रोहिबीशन ॲक्ट १९४९ चे कलम 65 (a), (e), 80, 81, 83 व 90 नुसार  कारवाई करण्यात आली.
              या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, सापळा रचुन वाहने तपासणी करतांना एक पांढऱ्या रंगाची आयशर कंपनीचे सहाचाकी मालवाहतुक वाहन ज्याचा प्रादेशिक परीवहन क्र. MH 08 W 7722 हे संशयीत वाहनास तपासणीकामी अडवुन सदर वाहनाची तपासणी केली असता प्रथमदर्शनी असे भासले की सदरचे वाहन पुर्णतः रिकामे आहे. पुर्ण वाहन तपासणी केली असता सदर वाहनात ड्रायव्हर कॅबीनच्या मागच्या बाजुस व गाडीच्या ट्रॉलीच्या पुढच्या बाजुस एक चोर कप्पा तयार केलेला मिळुन आला. चोर कप्प्यास मागील बाजुने मध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता परंतु चोर कप्प्यात जाण्यासाठी ड्रायव्हर कॅबीनच्या वर चढुन ताडपत्री उघडून बघीतले असता सदर चोर कप्प्यात अगदी तंतोतंत प्रमाणात फक्त 201 बॉक्स बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या चोरकप्प्यामध्ये पुढील प्रमाणे प्रोहिबीशन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळुन आला. 1) ऑल सिजन व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 293 काचेच्या सिलबंद बाटल्या (24.5 बॉक्स)
 2) ऑल सिजन व्हिस्कीच्या 180 मिली. क्षमतेच्या एकुण 1920 काचेच्या सिलबंद बाटल्या. (40 बॉक्स) 3) रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 290 काचेच्या सिलबंद बाटल्या. (24.5 बॉक्स) 4) रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 180 मिली. क्षमतेच्या एकुण 1968 काचेच्या सिलबंद बाटल्या. (41 बॉक्स) 5) डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 384 काचेच्या सिलबंद बाटल्या. (32 बॉक्स)
 6) डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या 180 मिली. क्षमतेच्या एकुण 1488 काचेच्या सिलबंद बाटल्या. (31 बॉक्स) 7) वोल्फ स्टोन व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 96 काचेच्या सिलबंद बाटल्या.
 (8 बॉक्स) तसेच सदर मद्यसाठा वाहतुकी वापरण्यात आलेला एक आयशर कंपनी निर्मित पांढऱ्या रंगाचे सहा चाकी वाहन (ट्रक) जिचा प्रदेशिक परिवहन क्र.MH 08 W 7722 आहे . सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मालेगाव विभागाचे निरीक्षक, लिलाधर वसंत पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे, सागर लक्ष्मण नलवडे, सहा.दु.निरीक्षक श्रीमती. वंदना देवरे, तसेच जवान दिपक गाडे, शाम पानसरे, प्रविण अस्वले, दिगंबर पालवी, गोकुळ परदेशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्ह्याचा तपास निरीक्षक लिलाधर वसंत पाटील हे करीत आहेत.