कल्याण दि २० ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य स्तरीय अधिवेशन दि. १० मार्च २०२४ ला कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते. सदर अधिवेशनाला जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड डी. एल. कराड , मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे व इतर मान्यवरांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनामध्ये सर्वानुमते अरुण गाडे यांची पुढील ५ वर्षाकरिता केन्द्रीय कार्यकरिणीचा अध्यक्ष म्हणुन एकमताने निवड करण्यात आली आहे व कास्ट्राईब महासंघाचे जुन्या सर्व कार्यकारिण्या रद्द करण्यात आल्या आहेत असे जाहिर करण्यात आले होते. तद्नंतर कास्ट्राईब महासंघाचे मान्यताप्राप्त घटनेनुसार नव्याने नियुक्त अध्यक्ष श्रि. अरुण गाडे यांनी महासंघाची नविन कार्यकारिणी दिनांक १८ मार्च, २०२४ रोजी घोषीत केली आहे. सदरहू कार्यकारीणी मध्ये श्री. सुशिल तायडे (अति. महासचिव), डॉ. दत्ता तपसे (अति. महासचिव), श्री. पवन वासनिक (उपसचिव-सामान्य प्रशासन), डॉ. नारायण सुर्यवंशी (सहसचिव), एड. गुलाब खंडारे (सह सचिव), श्रीमती राजश्री गायकवाड (महिला प्रतिनिधी) या नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महासंघाचे केन्द्रिय कार्यकारीणीमध्ये सुशिल तायडे सारखे अभ्यासू व तडफडतार नेतृत्वाचा समावेश झाल्यामुळे आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्मिती झालेली आहे. अन्यायाने ग्रस्त असलेले शेकडो कर्मचारी मोठ्या संख्येने कास्ट्राईब महासंघाचे सभासद होण्यास उत्सुक झालेले आहेत.अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली सुशील तायडेंच्या प्रवेशामुळे आदिवासी विकास विभागातीलच नव्हे तर इतर सर्व विभागातील कित्येक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागण्या व समस्यांचे संविधानिक पद्धतीने निराकरण होईल असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. तर कर्मचाऱ्यांनी आणि महासंघाने दाखविलेल्या विश्वासावर इमाने एतबाराने खरा उतरण्याचे प्रयत्न करणार असल्याचे भावना सुशिल तायडे यांनी व्यक्त केलेल्या आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी धोरण बंद करणे, १००% पद भरती करणे, वर्ग १ ते वर्ग ३ पदांवरील नियमित पदोन्नती श्रृंखला अखंडीत चालु करणे, वर्ग १ ते वर्ग ३ चे वरिष्ठ पदांवर मागास वर्गीयांना पदोन्नती मधील आरक्षण विना अट तात्काळ लागु करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगामधील वेतन संरचनेतील त्रुट्या दुर करणे, आदिवासी विकास विभागाचे आकृतीबंधामधील त्रुट्या व क्षेत्रीय यंत्रणेच्या पुर्नगठनामध्ये संभाव्य सुधारित अपेक्षित बदल करणे, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना मानिव दिनांकापासून नियमित वेतन लागु करने आणि त्यांचा सेवाज्येष्ठता यादीमध्ये समावेश करणे, आरोग्य विभागातील NHM अंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधुन ३०% पदभरती नियमित करणे ऐवजी १००% नियमित पदभरती करणे, अंगणवाडी सेविकांना नियमित वेतन श्रेणी लागु करणे, कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करणे, इ. असंख्य प्रश्नां सोबतच वेगवेगळ्या विभागांशी संबंधीत निरनिराळ्या योजनांमध्ये नाविन्यपुर्ण कल्याणकारी उपक्रम महासंघाचे वतीने शासन दरबारी प्रस्तावित करण्याचा मानस महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अति. महासचिव श्री. सुशिल तायडे यांनी व्यक्त केला.
महासंघाचे नविन कार्यकारिणी -अरुण गाडे - अध्यक्ष (नागपुर) एस.टी. गायकवाड - उपाध्यक्ष (बिड)हर्षवर्धन सोनवने - उपाध्यध (अहमदनगर)) अनिल धांडे - उपाध्यक्ष (कल्याण) हरीशचंद्र राठोड - उपाध्यक्ष (औरंगाबाद)गजानन थुल - महासचिव (वर्धा) शामराव हाडके - कोषाध्यक्ष (नागपूर) एकनाथ मोरे - मुख्य संघठक सचिव (नाशिक)आनंदराव खामकर- अतिरिक्त महासचिव (कोल्हापुर) सुशिल तायडे - ( अतिरिक्त महासचिव (नाशिक) दत्ता तपसे - अति. महासचिव (लोणावळा) पवन वासनिक - उपमहासचिव (सामान्यप्रशासन) (गोंदिया) यशवंत माटे - उपमहासचिव- (कार्यालय) (ब्रह्मपूरी) सिताराम राठोड - उपमहासचिव/ प्रसिद्ध सचिव (मौदा) प्रा. दिनेश सुर्यवंशी - सहसचिव ( पुणे) डॉ. नारायण सुर्यवंशी - सहसचिव ( मुंबई)ॲड गुलाब खंडारे - सहसचिव (मुंबई)श्रीमती राजश्री गायकवाड - महिला प्रतिनिधी (पूणे)मुख्य सल्लगार पदी करुणासागर पगारे (नाशिक)भाऊसाहेब वाघचौरे- (शिर्डी) ॲड अजय निकोसे