आदिवासी भागात भक्तीमार्ग व सनातन संस्कृतीचा प्रसार, प्रचार - हरे कृष्ण केंद्र
सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि १९
हरे कृष्ण केंद्र कुकरमुंडाच्या वतीने दुर्गम आदिवासी खेड्यांमध्ये हरिनाम संकीर्तन + सत्संग - प्रवचने + धार्मिक ग्रंथांचे वितरण आणि ग्रामीण आदिवासी भागात श्री कृष्ण प्रसादाचे वितरण, तसेच महान वैदिक सनातन संस्कृतीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.
अनेक युवक या उपक्रमात सामील होत आहेत, त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या केंद्रांसाठी प्रशिक्षण केंद्र, कीर्तन साहित्य, लाकडी मंदिराची गरज आहे आणि दुर्गम आदिवासी खेड्यांमध्ये नियमितपणे प्रसाद वाटपासाठी आम्हाला भाविक मदत करत आहेत.
पुस्तकाचे वितरण -
मोठे पुस्तक - 35 प्रती
लहान पुस्तक - 8 प्रती
मध्यम - 2 प्रती
बॅगसह जपमाला -
वाटप करण्यात येते आहे.