केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने दिलेल्या आश्वासनांना पूर्ण करण्यात कमी पडत आहेत. ही लढाई संविधानिक तत्त्वांची आणि लोकशाही वाचविण्याची आहे. सरकारच्या बोलघेवडे पणाबद्दल जनतेत प्रचंड रोष आहे.म्हणून यावेळी जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. हाच रोष या सरकारच्या पराभवाचे कारण ठरणार अशी भावना यावेळी सर्व नेत्यांनी व्यक्त केली.
भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास बघितला तर वकिलांनी देशविकासात प्रचंड योगदान दिले आहे. म्हणून संसदेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची वकिली करण्यासाठी ॲड. गोवाल पाडवी यांना संधी द्यावी असेही आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केले आहे.
यावेळी आमदार ॲड.के.सी.पाडवी,
आमदार शिरीष नाईक, ॲड. गोवाल पाडवी, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार उदयसिंग दादा पाडवी, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, अरुण चौधरी,रवी गावीत,अरुण रामराजे, दिलीप नाईक, सुभाष भाई पाटील, बापू चौरे,डी एस अहिरे, व्हि यु नाना पाटील,अरविंद वळवी साहेब, वसंत दोधा सुर्यवंशी, निलेश पाटील, संदिप परदेशी,राजकुमार सोनवणे, बिपीन पाटील, जालमसिग गावीत,विश्वनाथ वळवी,डॉ. सुरेश नाईक, नाथ्था पावरा, सी के पाडवी, श्री. मोयचा पावरा, आर.सी.गावीत, मकसुद खाटीक, सिताराम राऊत, श्री. ठाकुर, सुहास नाईक, भानुदास गांगुर्डे, मनोहर पाटील, रमेश वसावे, हारसिग पावरा, विक्रम पाडवी, रोहीदास पाडवी, नानसिंग वसावे, गेंदया पावरा, जहिरभाई, दिपक पटेल, सुरेश इंद्रजित, अजित नाईक, दिपक नाईक, देवमन पवार, रवीदादा पाडवी, पंडीत पवार, लाला बलोच उपस्थित होते.