आरोपीत १) तामेश्वर जलाराम पटेल वय- ४६ रा. कुबराडीह चिचोला राजनंदगाव छुरिया (छत्तीसगड)
२) अभिषेक प्रसाद रा. अमलदाबाद पुर्ण नाव माहित नाही.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दोन व्यक्ती दि २९ रोजी मानवी शरिरास अपायकारक पदार्थ मिळाला यांत मिळालेला माल १) १९००८००/- रु. कि. EAGLE HUKKAH SHISHA TOBACCO चे ४०० ग्रॅम वजनाचे एकुण २९७० पाऊच.
२) २४,५५,२००/- रु. कि. EAGLE HUKKAH SHISHA TOBACCO ०१ किलो वजनाचे १४४० पाऊच व २०० ग्रॅम वजनाचे ७२० पाऊच
३) १४,७६,६००/- रु. कि. महेंदी रंगाचे होला हुक्का शिशा तंबाखु ०१ किलो वजनाचे १८०० पाऊच.
४) ७,००,०००/- रु. कि. टाटा मोटर्स कंपनीची मालवाहू टेंपो क्र. GJ- २७ TD- ६९७९
एकुण :- मुद्देमाल. ६५,३२,२००/- रु. किमतीचा जप्त करण्यात आला आहे.
तळोदा पिसावर प्रकाशा रोडवरील देवपाटनाला जवळील रिलायंन्स पेट्रोलपंपासमोर यातील आरोपी तामेश्वर पटेल याने अभिषेक प्रसाद यांचे सांगणेवरुन महा. राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारीचा माल हा बेकायदेशिर विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतुक करतांना मिळुन आला म्हणुन पोलिसात भादवि कलम ३२८,३७३,२७२,१८८ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२),(IV),२७ (३) (d) (२७) (३) (e) ३० (२) (अ) कलम ३ चे उल्लंघन ५९ (i)
गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि शिवाजी बुधवंत करीत आहेत.