Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सतरा लाख ७६ हजार रुपये किंमतीची सुकलेल्या अफूची बोंडे व दोन किलो अफीम सह तस्करांच्या मुसक्या आवळल्या

शिरपूर, दि.३० (प्रतिनिधी) शिरपूर तालुका पोलिसांनी वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात पाच लाख ७६ हजार रुपये किंमतीची ७२ किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे व सात लाख रुपये किंमतीचे दोन किलो अफीम ची तस्करी करणाऱ्या दोन जणांचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
        सदर वाहनात अफू लपवला होता व संशय येऊ नये, म्हणून वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते.मात्र पोलिसाना गोपनीय माहितीच्या आधीच मिळाली असल्याने आरोपीत वाहन चालक व वाहक कृपालसिंग उमेदसिंग राजपुरोहित (वय - ३५), डोली पाचपदरी, जि बाडमेर, राजस्थान, ह.मु. नाकोडा स्वीट, येवला, जि. नाशिक) व रघुनाथसिंग कचरूसिंग गुजर (वय - २१), आनेडाटा, सोहासरा, जि.मन्सूर, मध्यप्रदेश) अशा दोन आरोपींतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्यांनी आपल्या पथकाला संशयित वाहनाच्या तपासणी करून कारवाईचे निर्देश दिले. पळासनेर तपासणी नाक्यावर नाकेबंदी करण्यात आली.तपासणीनाक्यावर वाहन क्रमांक (MP13 G B 3525 ) चे वाहन आले असता त्याची तपासणी केली, गाडीत विशेष कप्प्या बनवण्यात आला होता.तो दिसु नये म्हणून आधी लसुनचे पोते रचण्यात आले होते.गोपनीय माहीती असल्याने गाडीची कसुन तपासणी करत कप्प्याचा शोध घेतला असता त्यात पाच लाख ७६ हजार रुपये किंमतीची ७२ किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे व सात लाख रुपये किंमतीचे दोन किलो अफीम व पाच लाख रुपये किंमतीचे बोलेरो पिकप वाहन आढळून आले.वाहनचालक व वाहक यांना वाहनात असलेल्या मालसह ताब्यात घेतले आहे.
         सदरची कारवाई पेलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई- बाळासाहेब वाघ, असई- रफिक मुल्ला, पोहेकॉ संदिप ठाकरे, पोहेकॉ मंगेश मोरे, पोहेकॉ चत्तरसिंग खसावद, पोना दिनेश सोनवणे, पोकों शिवाजी वसावे, पोकों कृष्णा पावरा, पोकों वाला पुरोहित, पोकों दिनकर पवार, पोकॉ रोहिदास पावरा, पोकॉ जयेश मोरे, चापोकॉ मनोज पाटील यांनी केली असुन सदर वाहन चालक व क्लीनर यांचेव सी.सी.टी.एन.एस. गुरनं. 110/2024 गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 ते कलम 8 (क), 15 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.