Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तु डाकिण आहे" असे संबोधले व जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव दि ३१(प्रतिनिधी) तालुक्यातील रहिवासी महीला व्यवसाय घरकाम रा खुंटामोडीचा पितीपाडा धडगाव नंदुरबार या महिलेस तिच्या राहत्या घरासमोर "तु डाकिण आहे" असे संबोधले व जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           आरोपीत हारसिंग कंदऱ्या वळवी , पिसा दोहऱ्या वळवी व धनसिंग कंदऱ्या वळवी सर्व रा.खुंटामोडीचा पितीपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
           पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयावरुन डाकीण असल्याचे संबोधणारे आरोपीत हे खुंटामोडी गावातील राहणारे असुन ते एकमेकांचे भाऊ बंद आहेत दि. १९/०९/२०२३ रोजी ते ०१/०३/२०२४ रोजी पावेतो यातील आरोपी यांनी संगनमताने फिर्यादी हिस तु डाकीन आहेस व तुच भगतसिंग कंदऱ्या वळवी यास खाल्ले आहे असे वेळोवेळी टोचुन बोलुन तसचे माझा पती रणजित यास हाता बुक्यांनी मारहाण करुन तुम्ही गावातुन गेले नाहीतर तुम्हाला मारुन टाकु असे धमकी देवुन वेळोवेळी वाईट वाईट शिवीगाळ केली म्हणुन गुन्हा फिर्याद दिल्यावरुन ६६/ २०२४ भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ सह महा. नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधि. २०१३ चे कलम ३ (२) प्रमाणे जादुटोणा अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि आर. एन. पठाण करीत आहेत.