Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी उन्हातान्हात झोळीतून नेले; धडगांव तालुक्यातील विदारक चित्रबिरसा फायटर्सचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन

गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी उन्हातान्हात झोळीतून नेले; धडगांव तालुक्यातील विदारक चित्र
बिरसा फायटर्सचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन 

शहादा दि १ (प्रतिनिधी)धडगांव तालुक्यातील कात्रा गांवातील एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीसाठी व रूग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा पुरवावेत,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,सुरमल मोरे,इंदास पावरा, बबलू पावरा,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुकातील कात्रा या गावातील एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता उन्हातान्हात विना चप्पलाचे पायाला उन्हाचे चटके सहन करत नेतानाचे विदारक चित्र समोर आले आहे. लाकडाच्या एका काठीला चादर बांधून झोली तयार करून त्यात प्रसूतीसाठीच्या महिलेला काही लोक रूग्णालयापर्यंत नेत असतानाचा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होत आहे.आशा वर्कर ,आरोग्य सेविका यांना गरोदर महिलांना रुग्णालयात प्रसुतीसाठी आणत असताना डोंगर द-यातून मोठी कसरत करावी लागत आहे.बिकट वाटेवरून त्यांना रूग्णांना व गरोदर महिलांना रूग्णालय पर्यंत आणावे लागत आहे.खडतर रस्त्यावर रूग्ण खाली पडून रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

                गेल्या महिन्यातच अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी नेत असताना रुग्णवाहिका बंद पडल्याने एका गरोदर महिलेला दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.तशेच प्रकार पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही नंदूरबार जिल्ह्य़ात आरोग्याच्या सुविधा जैसे थेच आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे बिघडलेली दिसत आहे.रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी व रूग्णांची गैरसोय रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य सोयी व सुविधा गांवोगावांत पुरविणे आवश्यक आहे.तरी धडगांव तालुक्यातील कात्री गांवातील गर्भवती मातांच्या प्रसुतीसाठी व रूग्णांना उपचारासाठी तात्काळ आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.