Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पाडळदा येथे नमो युवा चौपाल उपक्रम आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न

पाडळदा येथे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नमो युवा चौपाल उपक्रम संपन्न 
शहादा दि १ (प्रतिनिधी)
 पाडळदा ता शहादा येथे भारतीय जनता युवा मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो युवा चौपाल हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
              सोमवार 1 एप्रिल रोजी शहादा तालुक्यातील
पाडळदा येथे श्रीकृष्ण मंदिरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी , नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनांत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो युवा चौपाल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी हे होते. यावेळी आ.पाडवी यांनी सांगितले की,युवकांच्या सहभागामुळे देशाचा विकास जलद गतीने होत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये युवक पुढे येत आहेत नरेंद्र मोदीच्या प्रेरणेमुळे युवक आज सक्रिय झालेले आहेत. युवकांनी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करून मजबूत देश निर्मितीसाठी मतदान करून घेण्याचे आवाहन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. राजेश पाडवी यांनी केले. यावेळी सदरच्या कार्यक्रमात भाजपाचे दिनेश खंडेलवाल, किसान मोर्चाचे डॉ. किशोर पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मतकर व तालुक्याचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केले.

            शेवटी आभार प्रदर्शन करताना मुनेश जगदेव यांनी सांगितले की, आमदार राजेश पाडवी यांच्या कामामुळे या शहादा तळोदा विधानसभा क्षेत्रात लोकसभेला प्रचंड मताधिक्य लाभणार आहे. आमदारांनी केलेल्या कामाचा फायदा निश्चितपणे लोकसभेसाठी होणार आहे. युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय होऊन लोकसभेमध्ये मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडायची आहे असे सांगितले. 
          सदरच्या कार्यक्रमासाठी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनीष पवार भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, प्रशांत कुलकर्णी, अप्पु पाटील यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर मुनेश जगदेव यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.पाडळदा सह नमो युवा चौपाल कार्यक्रम नंदूरबार येथे राबविण्यात आला असून जिल्हाभर आयोजन करण्यात आल्याचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.