भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट येथे ही बैठक पार पडली. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यातील विविध 37 समित्यांचे प्रमुख आणि सदस्य देखील उपस्थित होते. महामंत्री विजय भाऊ चौधरी यांनी याप्रसंगी समिती प्रमुखांना दिलेली जबाबदारी आणि त्या अनुषंगाने करावयाचे संपर्क कार्य याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, सत्तेत असताना सुद्धा गेल्या पाच वर्षाच्या काळात आपण सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली कोरोना महामारी प्रसंगात विविध स्वरूपात मदत पोहोचवून लोकांचे प्राण वाचवले मोदी सरकारच्या माध्यमातून झालेले हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचे असून त्या बळावरच खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांना आपल्याला साडेचार लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे लक्ष पूर्ण करावयाचे आहे, आणि म्हणून झटून कामाला लागा; असेही विजय भाऊ चौधरी यांनी आवाहन केले. लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी तथा धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे यांनी समितीप्रमुखांनी समन्वय कसा साधावा यावर मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख जितेंद्र पाटील, महिला मोर्चा प्रमुख संगीता जयस्वाल, प्रतिभा चौधरी, महेंद्र पाटील, माणिक माळी, प्रकाश चौधरी, शेखर माळी, लतेश मोरे, आनंद माळी, केतन रघुवंशी, लक्ष्मण माळी, ईश्वर साठे यांच्यासह शिरपूर साक्री शहादा नवापूर अक्कलकुवा धडगाव तळोदा नंदुरबार या सर्व तालुक्यातील समिती प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते.