बिरसा फायटर्समुळे पिण्याच्या पाण्याची सोय, कामाचे होतेय सर्वत्र कौतुक
शहादा दि २८ (प्रतिनिधी)तहसील कार्यालय शहादा येथे पिण्याची पाण्याची सोय नव्हती,म्हणून बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार संघटनेकडून काही दिवसांपूर्वी तहसीलदार शहादा यांना निवेदन देण्यात आले होते.
निवेदन देतांना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गणेश खर्डे,रेवसिंग खर्डे, रायसिंग खर्डे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.याकामात पत्रकार जगन ठाकरे यांनीही वृत्तपत्रातून आवाज उठवला.
शहादा शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असणा-या तहसील कार्यालय शहादा येथे लोकांना व कर्मचाऱ्यांना पिण्याची पाण्याची सोय नव्हती.तहानलेले लोक इकडून तिकडे पाण्यासाठी भटकत होते.बिसलरीचे विकत पाणी आणून पित होते. लोकांची गैरसोय होत होती.बिरसा फायटर्स संघटनेकडून याबाबत तहसीलदार शहादा यांना निवेदन देऊन आवाज उठविण्यात आला होता.तालुक्याचे मुख्य शासकीय ठिकाण असूनही पाण्याची सोय नाही.बिरसा फायटर्सचा आवाज प्रशासन पर्यंत पोहचला.अन् तहसील कार्यालय शहादा परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी एकूण ६ मोठे माठ भरून पाणी ठेवण्यात येत आहेत. बिरसा फायटर्स संघटनेचे कामच लय भारी!असं सर्वत्र कौतुक होत आहे.