तळोदा दि २७ (प्रतिनिधी)
शहरातील सोमनाथ सखु महाराज पाडवी वय- २१ रामगड रा. भिलाटी ता. तळोदा जि. नंदुरबार याचा कडे गैरकायदा तलवार कब्जात बाळगताना आढळून आला.
५,०००/- रु. कि. एक लोखंडी धारदार तलवार आढळून आली यातील आरोपीत मजकुर हा मानवी जिवीतास घातक असलेली लोखंडी बनावटीची धारदार व टोकदार तलवार गैरकायदा कब्जात बाळगुन मिळुन आला तसेच मा. जिल्हाधिकारी सो. यांचे कडील आदेश क्र. २०२४/ड/ कक्ष- २/ पीओएल/ कावी/२५१ नंदुरबार दि. १४/०३/२०२४ अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पोशि शोएब शेख नेमणूक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून तलवार कब्जात बाळगणे २०२४ महा. पो. अधि. का. क. ३७ (१), (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे व भा.हत्यार का. क. ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि देसले पोउनि धर्मेंद्र पवार तपास करीत आहेत.
अक्कलकुवा दि २७
राजु जालमसिंग शिकलीकर वय - ३८ रा. शिखफळी अक्कलकुवा हा गैरकायदा तलवार कब्जात बाळगताना मिळुन आला त्याचा ताब्यात मिळालेला माल ४५००/- रु. कि. तीन लोखंडी तलवार होत्या. आरोपीत याने त्याचेकडे कुठलाही शस्त्र परवाना नसतांना वरील प्रमाणे घातक शस्त्रे बाळगतांना मिळुन आला.आदिनाथ गोसावी नेमणूक अक्कलकुवा. पोस्टे यांच्या फिर्यादीवरून तलवार कब्जात बाळगणे२०२४ महा. पो. अधि. का. क. ३७ (१), (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे व भा.हत्यार
का. क. ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि नानासाहेब नागदरे ,पोउनि केशव आडके करीत आहेत.