निवेदनाचा आशय असा,नंदुरबार जिल्ह्यातील सराफ व्यपारी आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक 23 मार्च रोजी आमचे सराफ व्यापारी संजय रमेशचंद्र सोनार यांचे सेल्समन व ड्रायव्हर प्रेम कपूर दोघे रा. शहादा ह्या दोघांना अज्ञात 4 ते 5 लोकांनी बंदुकीचा धाक त्याचा गाडीचा ताबा आपल्या कडे घेतला त्यानंतर त्याचा जवळ असलेले सर्व तयार दागिने अंदाजे वजन एक ते दीड किलो वजनांचे सोन्याचे सर्व ताब्यात घेऊन या दोघांना शिंदखेडा येथील आशापुरी मंदिरा जवळ सोडून सर्व आरोपी हे पसार होऊन गेले याबाबत आम्ही शहादा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे . सर्व सराफी व्यपारी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे आम्ही आपल्याला विनंती करतो की सदर घटना हे नंदुरबार सारख्या जिल्ह्यात घडत आहे मूळ नंदुरबार जिल्ह्याला काही प्रमाणात हा डाग लागल्या सारखे आहे. यामुळे दरोडेखोर लोकांची हिम्मत ही अजून वाढेल ती वाढू नये म्हणून आपण या घटनेचा तपास अत्यंत जलद गतीने करून आमच्या व्यपारीला न्याय मिळवून द्यावा व नंदुरबार मध्ये असे केल्यास पोलीस काय करू शकतात हे दाखवून द्यावे जेणेकरून आमच्या व्यपारी वर उपासमारी ची वेळ येऊन नये व त्याचे कुटुंब उध्वस्त होऊन अशी विनंती आम्ही नंदुरबार जिल्हा सराफ सुवर्णकार व्यपारी असोसिएशन तर्फे करत आहोत
यावेळी नंदुरबार पोलीस अधीक्षक यांना निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ,कार्याध्यक्ष सुनिल सोनार,आनंद सोनार,जगदिश भाई सोनी,हिरालाल सोनी,,सत्यवान सोनार,संजय सोनार,निलेश सोनार, सोमेश्वर सोनार,हेमंत सोनार,मनोज सोनार,मुन्नु सोनार, प्रितेश सोनार,भटू सोनार,राजू भाऊ सोनार,राजा काका सोनार,दिलीप सोनार आदी सराफ असोशिएशनचे सदस्य हजर होते.